मुंबई, 11 ऑक्टोबर: मुंबईत शिवाजी पार्कवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या धरपकडीनंतर शिवसेना भवनाबाहेर मोठा तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांच्या कारवाईविरोधात आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आक्रमक झाले असून त्यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना भवनाबाहेर ठिय्या मांडला आहे. यावेळी पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाली असून, आता थेट ‘महाराष्ट्र बंद’ करण्याचा इशारा आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिला आहे.
दिल्लीनंतर आता मुंबईतही आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवाजी पार्कवर सीजेपीचे (CJP) आंदोलन सुरू असताना मुंबई पोलिसांनी समर्थकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी रस्ता बंद केल्यामुळे उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि शिवसेना भवनाबाहेर मोठा गोंधळ उडाला. या कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी राज्य सरकार आणि ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
या सर्व घडामोडींवर आदित्य ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “हे शांततेत चालले होते, मात्र मुद्दाम ते बिघडवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यांची दादागिरी सुरू असून आता आम्ही शांत बसणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. “अमित ठाकरे यांनाही अटक करण्यात आली आहे. आता मुंबई पोलिसांमुळेच संपूर्ण मुंबई बंद पाडणार,” अशी संतप्त प्रतिक्रिया देत, पोलीस शिवसेना भवनात शिरल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.
तणाव वाढल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आंदोलकांना घेऊन जाणारे पोलिसांचे वाहन रोखून धरले आणि ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडण्याची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणामुळे शिवसेना भवन परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. आदित्य, अमित आणि तेजस ठाकरे स्वतः रस्त्यावर उतरल्याने मुंबईतील परिस्थिती अत्यंत गंभीर बनल्याचे चित्र आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात परतताच अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा; मोदींवर हल्लाबोल करत जाहीर केला आंदोलनाचा प्लॅन
- दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, नेहा बोराने धावत्या बसमधून दाखवला पोलिसांच्या क्रूरतेचा चेहरा
- CJP च्या आंदोलकांना ताब्यात घेतल्याने मनसे, युवा सेना आक्रमक; अमित व आदित्य ठाकरेंनी अडवल्या पोलिसांच्या गाड्या








