Share

महाराष्ट्रात परतताच अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा; मोदींवर हल्लाबोल करत जाहीर केला आंदोलनाचा प्लॅन

महाराष्ट्रात परतल्यानंतर अभिजीत दीपके यांनी माध्यमांशी संवाद साधत मोदी सरकारवर जोरदार टीका केली असून, राजीनाम्यासाठी आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.

Published On: 

Abhijeet Dipke criticizes PM Narendra Modi on instagram video

प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: आजीच्या निधनामुळे दिल्लीहून महाराष्ट्रात परतलेल्या अभिजीत दीपके यांनी आपल्या आंदोलनाबाबत मोठी घोषणा केली आहे. काहीही झाले तरी आपला लढा थांबणार नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीविरोधात हे आंदोलन सुरूच राहील, असा ठाम निर्धार त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. आम्ही शांत बसणार नाही आणि कोणत्याही कारवाईला घाबरणार नाही, असे त्यांनी (Abhijeet Dipke) स्पष्ट केले.

मुंबईत शिवसेना भवनासमोर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तेथे शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला असून पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड झाली आहे. आदित्य ठाकरेंनी माघार न घेण्याची भूमिका घेतली असून, या परिस्थितीवर बोलताना दीपके म्हणाले की, आता प्रत्येकालाच रस्त्यावर उतरून लढावे लागणार आहे.

एकट्या ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत आणीबाणी लादल्याचा आरोप दीपके यांनी केला. यासाठी मेट्रो आणि बससेवा बंद करण्यात आली. विद्यार्थ्यांना डांबून ठेवण्यात आले असून, विमानातून अटक करण्याची देशातील ही पहिलीच कारवाई आहे. “आम्ही काय दहशतवादी आहोत का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

संपूर्ण देश अडाणींना विकला जात असल्याची घणाघाती टीका करत दीपके यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले. पोलीस तरुणांना मारहाण करत आहेत. नरेंद्र मोदींच्या आदेशावरून पोलिसांना मुलांचे खूनही करावे लागतील, मग दिल्ली पोलीस अशा प्रकारे खून करायला तयार आहेत का? असा थेट प्रश्न त्यांनी विचारला. जेव्हा देश गुंड चालवतात, तेव्हा गुंडांनाच बढती मिळते, असा आरोप त्यांनी केला.

आपण महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारे लोक आहोत, असे दीपके म्हणाले. मला बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन घाबरवण्याचा प्रयत्न झाला, पण मी डगमगणार नाही. मोदींसारखे हुकूमशहा येतील आणि जातील, पण हा देश असाच राहील. जोपर्यंत राजीनामा मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन यापुढेही सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही