बीड, 11 ऑक्टोबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांच्यावर तरुणांच्या एका जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. “मनोज जरांगे यांच्या विरोधात का बोलतोस?” अशी विचारणा करत आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप खुणे यांनी केला आहे. तसेच, स्वतः जरांगे यांनीच या हल्ल्यासाठी सुपारी दिल्याचा दावाही त्यांनी (Amol Khune) केला आहे.
रविवारी दुपारी अमोल खुणे हे पाली गावाजवळील नागनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्याचवेळी तुळजापूरहून ज्योत घेऊन येणाऱ्या काही तरुणांचा गट तिथे पोहोचला. या तरुणांनी मंदिराचे गेट बंद करून लाकडी दांडक्याने आपल्याला बेदम मारहाण केल्याचे खुणे यांनी सांगितले. या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाली असून, सध्या त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यामागचे कारण सांगताना अमोल खुणे यांनी नारायणगडावरील दसरा मेळाव्याचा संदर्भ दिला आहे. आपण नारायणगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले होते. आपण तिथे पोहोचू नये आणि या मेळाव्याला हजेरी लावू नये, याच उद्देशाने आपल्यावर हा हल्ला घडवून आणल्याचा दावा खुणे यांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, हल्ला करणारे ते तरुण नेमके कोण होते आणि यामागचे निश्चित कारण काय, याचा कसून तपास पोलिसांकडून सुरू आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘आजी वारल्यानंतर फोनही दिला नाही’; नागपुरात परतताच अभिजित दिपकेंनी सांगितला दिल्ली पोलिसांचा धक्कादायक घटनाक्रम
- नांदेडमध्ये अवैध रेती माफियांवर पोलिसांची धडक कारवाई; तब्बल २ कोटी १९ लाखांचा मुद्देमाल जप्त
- अभिजीत दिपकेंपासून आजीच्या निधनाची बातमी लपवली? दिल्ली पोलिसांनी व्हिडीओ दाखवत दिले स्पष्टीकरण
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









