अहिल्यानगर, 25 ऑक्टोबर: भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिर्डी येथे साई समाधीचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या ५०० कोटींच्या आरोपांवर स्पष्टीकरण देत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. ५०० कोटी ही फार मोठी रक्कम असून ती हातातून, बॅगेतून किंवा गाडीतून नेता येत नाही, असे लाड यांनी म्हटले आहे.
५०० कोटींच्या देवाण-घेवाणीचा आरोप हा पूर्णपणे खोटा नॅरेटिव्ह असल्याचे सांगत लाड यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. राऊत हे ‘स्क्रिप्ट मास्टर’ असून, ‘सामना’च्या प्रेसमध्ये ही स्क्रिप्ट लिहिली गेली आहे. त्यामुळे एसआयटीने राऊत यांना बोलावून त्यांची चौकशी करावी आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
आम्ही कायम मनोज जरांगे यांच्या पाठीशी असून त्यांची बदनामी होऊ नये याची आम्हाला काळजी आहे, असे लाड म्हणाले. तसेच, उद्धवजींच्या काळात जसे १०० कोटी जमा केले, तसे आता ५०० कोटी जमा करायचे होते का? असा सवाल करत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी केली. ही टेप कुणी आणि कशी पोहोचवली याचाही शोध घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना लाड म्हणाले की, शिंदे हे आमचे नेते आहेत. त्यांचे पंख छाटण्याइतपत ते छोटे नाहीत. त्यांना देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पूर्ण बळ असून, आम्ही सर्व ताकतीने त्यांच्या पाठीशी उभे आहोत.
रामदास कदम यांच्याबाबत बोलताना, ‘झालं गेलं गंगेला मिळालं’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री शिंदेंनीही त्यांना सूचना दिल्याचे सांगत, महायुती एकत्र राहिली पाहिजे हीच आपली भूमिका असल्याचे लाड यांनी स्पष्ट केले. साईबाबांच्या चरणी फुले वाहून आपण या विषयावर पाणी टाकल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
मुंढवा जमीन घोटाळ्यावरही लाड यांनी भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नसून दोषींना पकडले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यालाही चौकशीला बोलावले होते, यावरून मुख्यमंत्री पारदर्शकतेने गृह खाते सांभाळतात, असा दावा लाड यांनी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- अभिषेक शर्माचा ऐतिहासिक विक्रम; टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
- या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
- ‘त्या छोट्या चुकांमुळे आम्हाला फटका बसला’; सलग दुसऱ्या पराभवानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरची खंत
Quick Answers
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याला दुजोरा देत प्रसाद लाड म्हणाले की, ५०० कोटी ही फार मोठी रक्कम असून ती हातातून, बॅगेतून किंवा गाडीतून नेता येत नाही. तसेच ५०० कोटींच्या देवाण-घेवाणीचा आरोप हा पूर्णपणे खोटा नॅरेटिव्ह असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय राऊत हे 'स्क्रिप्ट मास्टर' असून 'सामना'च्या प्रेसमध्ये ही स्क्रिप्ट लिहिली गेली आहे, असा आरोप लाड यांनी केला. त्यामुळे एसआयटीने राऊत यांना बोलावून त्यांची चौकशी करावी आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.
एकनाथ शिंदे हे आमचे नेते असून त्यांचे पंख छाटण्याइतपत ते छोटे नाहीत, असे लाड म्हणाले. त्यांना देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पूर्ण बळ असून आम्ही सर्व ताकतीने त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असे त्यांनी सांगितले.
मुंढवा जमीन घोटाळ्यावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नसून दोषींना पकडले जाईल, असा विश्वास लाड यांनी व्यक्त केला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







