“उद्या यांना मुलं झाली तरी संजय राऊतांचे नाव घेतील”, ऑडिओ क्लिपवरून राऊतांचा भाजपवर घणाघात

कथित ऑडिओ क्लिपवरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार पलटवार केला असून, ‘उद्या यांना मुलं झाली तरी माझंच नाव घेतील’ असा टोला लगावला आहे.

Published On: 

Sanjay Raut criticizing BJP over audio clip controversy.

प्रतिनिधी, 26 ऑक्टोबर: मनोज जरांगे यांच्याकडे असलेल्या कथित ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापले असून, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ही क्लिप आपणच बनवली असल्याचा आरोप करणारे भाजप नेते प्रसाद लाड यांना राऊतांनी खोचक टोला लगावला आहे. ‘भाजपच्या लोकांना काहीही काम उरलेले नाही. उद्या यांना मुलं झाली तरी संजय राऊतांमुळेच झाली म्हणून हे लोक बोंब मारतील,’ अशा जळजळीत शब्दांत राऊतांनी समाचार घेतला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा पलटवार केला.

मनोज जरांगे पाटील यांच्याकडील क्लिप उबाठा गटाच्या वॉररुममध्ये तयार करण्यात आली असून, यामागे संजय राऊत यांचा हात असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी केला होता. तसेच याप्रकरणी राऊतांच्या चौकशीची मागणीही त्यांनी केली होती. यावर बोलताना राऊत म्हणाले की, क्लिपमधील आवाज अत्यंत स्पष्ट आहेत. मात्र, तरीही भाजप नेते मूर्खपणाचे आणि हास्यास्पद आरोप करत आहेत. लोक त्यांच्या या बोलण्यावर हसत आहेत. पैसा आणि सत्तेच्या जोरावर हे लोक वळवळत असून त्यांच्याकडे मेंदू नाही, तर तो केवळ एक मातीचा गोळा असल्याची घणाघाती टीका राऊतांनी केली. तसेच, दिल्लीत बसलेल्या त्यांच्या बड्या नेत्यांचाही मेंदू चालत नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

यावेळी संजय राऊत यांनी एका मोठ्या प्रकरणाला वाचा फोडल्याबद्दल आणि राजकारण्यांचा विद्रूप चेहरा देशासमोर आणल्याबद्दल मनोज जरांगे यांचे आभार मानले. टेप कुणाची आणि त्यातील आवाज कुणाचे हे स्पष्ट असतानाही भाजप नेते आपल्या अकलेचे प्रदर्शन करत असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावरून निर्माण झालेल्या वादावरही राऊतांनी भाष्य करत त्यांची पाठराखण केली. ग्रामीण भागात वडिलांना ‘बाप’ किंवा ‘म्हातारा’ म्हणण्याची पद्धत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खरगे हे अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेले अनुभवी नेते आहेत. त्यांच्या विधानाचा विपर्यास करून रस्त्यावर उतरल्याने भाजपला कोणतीही सहानुभूती मिळणार नाही. कुणीही पंतप्रधानांच्या वडिलांचा उद्धार केलेला नाही, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, लहान मुलांसारखे भोकाड पसरण्याची आणि छाती बडवत ‘माझी आई काढली, माझा बाप काढला’, असे सांगण्याची मोदींना सवयच जडली आहे. प्रत्यक्षात कुणी कुणाचा बाप काढत नसून, या सरकारचा बाप सत्तेतून जाईल, असाच त्या म्हणण्याचा अर्थ असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

मनोज जरांगे पाटील यांच्याकडील क्लिप उबाठा गटाच्या वॉररुममध्ये तयार करण्यात आली असून, यामागे संजय राऊत यांचा हात असल्याचा दावा भाजप नेते प्रसाद लाड यांनी केला होता. तसेच त्यांनी याप्रकरणी राऊतांच्या चौकशीची मागणीही केली होती.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही