प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: पुण्यात ठाकरे गटाच्या नेत्या रेखा कोंडे यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा हल्ला मनोज जरांगे यांच्या सांगण्यावरूनच झाल्याचा गंभीर आरोप स्वतः रेखा कोंडे यांनी केला आहे.
आरती मारणे नावाच्या महिलेने आपल्याला मारहाण केली असून ती जरांगे यांची समर्थक असल्याचा दावा कोंडे यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण मनोज जरांगे यांच्या विरोधात बोलत असल्यानेच हा भ्याड हल्ला करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
मनोज जरांगे यांनी आपल्या अंगावर ‘भाड्याच्या, बिनबुडाच्या आणि विकृत’ महिला सोडल्याचा आरोप कोंडे यांनी केला. दरम्यान, कोंडे यांनी आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करून जरांगे यांची बदनामी केल्याचा आरोपही झाला होता. मात्र, हे आरोप पूर्णपणे खोटे, चुकीचे आणि जाणीवपूर्वक केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणाला आपण कायद्यानेच चोख उत्तर देणार असल्याचे सांगत, रेखा कोंडे यांनी याप्रकरणी पोलिसांत एफआयआर (FIR) दाखल केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानातून रोहित पवारांचाही प्रवास; नवनाथ बन यांचा खळबळजनक आरोप
- हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील दोन स्थानकांचे काम पूर्ण; डिसेंबरमध्ये प्रवाशांसाठी खुली होण्याची शक्यता
- ड्रेसिंग रूमच्या बातम्या फोडल्याच्या आरोपांवर सरफराज खानचे मौन भंग; म्हणाला, ‘गौतम गंभीरने मला…’








