बाळासाहेबांचा फोटो फाडल्याचा आरोप; पुण्यात ठाकरे गट आक्रमक, मुठा नदीत शिंदे-शायना एनसींच्या पोस्टरचे विसर्जन

शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटो फाडल्याच्या आरोपावरून पुण्यात ठाकरे गट आक्रमक झाला असून, त्यांनी मुठा नदीत फाडलेले पोस्टर विसर्जित करत तीव्र निषेध नोंदवला.

Published On: 

Thackeray faction protesting in Pune against Eknath Shinde and Shaina NC.

प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: पुण्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेविरोधात तीव्र आंदोलन केले. शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्या शायना एनसी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी हा संताप व्यक्त केला. या घटनेचा निषेध म्हणून ठाकरे गटाने एकनाथ शिंदे आणि शायना एनसी यांचे पोस्टर फाडून पायदळी तुडवले. त्यानंतर या फाडलेल्या पोस्टरचे थेट मुठा नदीत विसर्जन करण्यात आले.

या वादाची मूळ सुरुवात मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेतून झाली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी सोनिया गांधी लिखित ‘बिलॉन्गिंग- अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाविरोधात जोरदार रान उठवण्यासाठी या परिषदेचे आयोजन केले होते. या पुस्तकातील मजकूर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणारा असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला. त्याचा निषेध म्हणून प्रवक्त्यांनी सर्वांसमक्ष पुस्तकातील काही पाने फाडली.

याच आंदोलनादरम्यान शायना एनसी यांच्याकडून एक चूक घडली. इतर प्रवक्ते फोटो आणि पुस्तकाची पाने फाडत असताना, शायना एनसी यांच्या हातून सर्वांदेखत चुकून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेला. फोटो फाडताना चूक लक्षात येताच त्या अर्ध्यावरच थांबल्या आणि त्यांनी जीभ चावली. मात्र, या प्रकारामुळे मोठा गदारोळ उडाला.

या संपूर्ण वादानंतर शायना एनसी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपण बाळासाहेबांचा नाही, तर मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडला असल्याचा दावा त्यांनी केला. “आम्ही मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडलाय. एकदा नाही तर १० वेळा आम्ही मणिशंकर अय्यर यांचा फोटो फाडू,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर काही वेळातच शायना एनसी विधानभवनात पोहोचल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधानभवनात बोलावून घेतल्याची माहिती समोर आली आहे. पत्रकार परिषदेत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याच्या प्रकाराबाबतच चर्चा करण्यासाठी त्यांना बोलावण्यात आल्याची चर्चा सुरू झाली असून, आता एकनाथ शिंदे त्यांना काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही