दिवाळीच्या फराळावर FDA ची करडी नजर; तुकाराम मुंडेंनी पुण्यात स्वतः तपासले लाडू-चिवडे

एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पुण्यात एका कार्यक्रमात स्वतः लाडू-चिवड्याची पाहणी केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांना कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

Published On: 

Tukaram Munde FDA inspecting Diwali snacks in Pune

पुणे, 1 नोव्हेंबर: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, आयुक्त तुकाराम मुंडे (FDA Tukaram Munde) यांनी स्वतः मैदानात उतरून पाहणीला सुरुवात केली आहे. पुण्यातील एका सार्वजनिक फराळ वाटप कार्यक्रमात त्यांनी लाडू आणि चिवड्याच्या दर्जाची प्रत्यक्ष तपासणी केली. ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न न पुरवल्यास उत्पादक व विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा थेट इशारा त्यांनी दिला.

पुण्यात झालेल्या या कार्यक्रमादरम्यान मुंडे यांनी फराळ वाटप उपक्रमाचे कौतुक केले. मात्र, अन्नसुरक्षेबाबत त्यांनी काही महत्त्वपूर्ण सूचनाही दिल्या. यात प्रामुख्याने तांत्रिक पर्यवेक्षण, पदार्थांमध्ये नैसर्गिक रंगांचा वापर करणे आणि उघड्यावरील खाद्यपदार्थांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे या बाबींवर त्यांनी भर दिला.

सणासुदीच्या काळात भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री रोखण्यासाठी एफडीएची राज्यभरात मोठी मोहीम सुरू असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. दिवाळीपूर्वीच मसाले आणि खाद्यतेलातील भेसळीविरोधात कारवाई करत हजारो क्विंटल साठा जप्त करण्यात आला आहे. अनधिकृत आणि भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर एफडीएचा कडक पहारा असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

उत्पादक आणि विक्रेत्यांनी नियमांचे पालन करत ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार खाद्यपदार्थ पुरवावेत, असे निर्देश त्यांनी दिले. यासोबतच, खरेदी केलेल्या खाद्यपदार्थांबाबत काही संशय वाटल्यास नागरिकांनी ‘complaints.mahafda.in‘ या पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे आवाहनही एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही