प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या कन्येचा नामकरण सोहळा नुकताच पार पडला आहे. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या बारशात राज ठाकरे यांनी आपल्या लाडक्या नातीचे नाव ‘अहिल्या’ असे ठेवले आहे. ठाकरेंनी निवडलेल्या या ऐतिहासिक नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
अमित ठाकरे यांच्या घरी ७ सप्टेंबर रोजी या चिमुकलीचे आगमन झाले होते. अमित यांचा मुलगा कियानला अहिल्याच्या रूपाने बहीण मिळाली आहे. घरात कन्यारत्नाचा जन्म झाल्याने संपूर्ण ठाकरे कुटुंबात आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले होते.
राज ठाकरेंनी नातीसाठी निवडलेल्या ‘अहिल्या’ या नावाला एक खास अर्थ आहे. संस्कृत भाषेनुसार या नावाचा अर्थ सुंदर, पवित्र, निष्कलंक आणि दोषरहित असा होतो. हिंदू पुराणातील उल्लेखांनुसार, अहिल्या या गौतम ऋषींच्या पत्नी होत्या. त्यामुळे हे नाव सौंदर्य, पावित्र्य तसेच सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते.
📌 महत्वाच्या बातम्या
- विराट कोहली आणि रोहित शर्माची खास मैत्री; ऑकलंडमधील सराव सत्रातील क्षणांनी जिंकली चाहत्यांची मने
- ऑकलंडच्या नेट सत्रात विराट कोहलीला घाम, युवा गोलंदाज आकिब नबीच्या घातक स्पेलने सतावले
- दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना दणका; व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








