‘काही जणांचा फोन २०१९ नंतर थांबला तो थांबलाच’, उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या २०१९ च्या फोनवरील टोलेबाजीला उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांच्या पुस्तक प्रकाशनात जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.

Published On: 

Uddhav Thackeray responding to Devendra Fadnavis at Sanjay Raut book launch

प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: खासदार संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाचे (३१ ऑक्टोबर) प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांना सडेतोड उत्तर दिले. “काही जणांचा फोन २०१९ सालानंतर थांबला तो थांबला,” असा टोला ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगावला. यावेळी मंचावर मनसे प्रमुख राज ठाकरे हेदेखील उपस्थित होते.

याआधी २९ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्राची हास्यरेषा’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. तेव्हा एकाच मंचावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून एक मिश्कील विधान केले होते. “२०१९ सालापर्यंत उद्धव ठाकरेंनी जेव्हा-जेव्हा फोन केला, तेव्हा-तेव्हा मी गेलो. पण २०१९ सालानंतर त्यांनी बोलावलंच नाही,” असे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या याच टोलेबाजीला उद्धव ठाकरेंनी आजच्या कार्यक्रमात उत्तर दिले.

आजच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी वाचनाचे महत्त्व विशद केले. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत यांचे काही किस्सेही सांगितले. “सामनात काही गडबड असेल तर मी संजयला फोन करायचो. तोपर्यंत बाळासाहेबांचा राग शांत झालेला असायचा. ओव्या कोणाला द्यायच्या आणि शिव्या कोणाला द्यायच्या, हे संजय राऊतांना कळतं,” अशी आठवण ठाकरे यांनी सांगितली.

आजकाल लिखाण नाहीसे होत चालल्याचे मतही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले. ते म्हणाले, “आताच्या पिढीला काही हवं असेल तर ‘चॅट जीपीटी’ (Chat GPT) आहे. आज वाचण्याची वेळ राहिली नाही.” दरम्यान, या सोहळ्यात राज ठाकरे यांनीही आपले विचार मांडले. त्यांनी राजकीय भाष्य न करता आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत भाषण केले व संजय राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीचे काही किस्से उपस्थितांना सांगितले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही