मुंबई, 1 नोव्हेंबर: प्रसिद्ध मराठी अभिनेता अभिजीत केळकर याने एका फेसबुक पोस्टद्वारे आपल्या जीवाला धोका असल्याचा धक्कादायक दावा केला आहे. मालाड येथील चाळीतील घरे जमीनदोस्त करण्याचा घाट काही बिल्डर आणि स्थानिक लोकप्रतिनिधी घालत असल्याचा आरोप त्याने केला आहे. या गंभीर प्रकरणात त्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मदतीची विनंती केली आहे.
मालाड पूर्व परिसरातील पुष्पापार्क आणि बाणडोंगरी या भागात आपली वडिलोपार्जित घरे असल्याचे अभिजीतने नमूद केले आहे. आपल्या आई-वडिलांनी रक्ताचे पाणी करून आणि काडी-काडी जमवून हा संसार उभा केल्याचे तो म्हणाला. याला कोणी झोपडपट्टी म्हणत असले तरी, गरिबांचे छप्पर हिरावून त्यांना रस्त्यावर आणण्याचे प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून सुरू असल्याचे त्याने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.
बिल्डरांच्या पैशाच्या जोरावर लोकप्रतिनिधी हे सर्व नियंत्रित करत असून व्यवस्थेला हातावर खेळवत असल्याचा आरोप केळकरने केला आहे. कोणताही करार न करता आणि कागदपत्रे न दाखवता घरे पाडली जात आहेत. तसेच लोकांना धमक्या देण्यासाठी गुंड पाठवले जात असल्याचा दावाही त्याने केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आपण हा प्रकार पाहत असल्याचे तो म्हणाला.
सध्या कोणालाही बदनाम करायचे नसल्याने आपण नावे घेणार नाही, मात्र वेळ आल्यावर नावे घ्यावीच लागतील, असा इशारा त्याने दिला आहे. “मी कोणाला घाबरत नाही, पण माझ्या जीवाला धोका आहे. घरी आई, बायको, मुलांना सांगून मी निघालोय,” अशी भीती त्याने व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मनात नितांत आदर असला तरी येथे ‘दिव्याखाली अंधार’ असल्याची खंत व्यक्त करत, हक्काची घरे आणि न्यायासाठी त्याने मदतीचे आवाहन केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- कोण आहेत निधी राझदान? मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांशी विवाह केल्याने आल्या चर्चेत
- दारूच्या प्रत्येक बाटलीवर १० रुपये अतिरिक्त आकारणार; रिकामी बाटली दिल्यास मिळणार परतावा
- बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटीनंतरची WTC गुणतालिका: वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून विजय
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








