राधिका आपटेचा देवावर विश्वास नाही; म्हणाली, “लोकांनी मूर्तीपेक्षा निसर्गाची…”

राधिका आपटेने आपण नास्तिक असल्याचा खुलासा केला असून, लोकांनी मूर्तीऐवजी निसर्गाची पूजा करावी असे मत तिने ‘अक्का’ सीरिजच्या प्रमोशनदरम्यान मांडले.

Published On: 

Radhika Apte commenting on god and nature worship during Akka series promotion

प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: अभिनेत्री राधिका आपटे हिने आपण नास्तिक असल्याचा खुलासा केला आहे. आपला देवावर विश्वास नसून निसर्ग हीच सर्वोच्च शक्ती असल्याचे तिने म्हटले आहे. आगामी ‘अक्का’ या वेब सीरिजच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या मुलाखतीत तिने हे मत मांडले. लोकांनी मूर्तीपूजेपेक्षा निसर्गाची पूजा करावी, अशी भावना राधिकाने व्यक्त केली.

याच मुलाखतीत तिच्यासोबत असलेली अभिनेत्री कीर्ती सुरेश हिने मात्र आपला देवावर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. “कोणतीतरी दैवी शक्ती नक्कीच आहे आणि माझी देवावर श्रद्धा आहे. मला माहीत असलेल्या पद्धतीने मी प्रार्थनाही करते, पण मी स्वतःला धार्मिक मानत नाही,” असे कीर्ती म्हणाली.

राधिका आणि कीर्ती यांची मुख्य भूमिका असलेली ‘अक्का’ ही वेब सीरिज ३० ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अंडरवर्ल्डच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या या कथेत निष्ठा, विश्वासघात आणि सूडाचे नाट्य पाहायला मिळणार आहे. नेटफ्लिक्स आणि वायआरएफ एंटरटेनमेंट यांच्या भागीदारीतील या सीरिजचे लेखन आणि दिग्दर्शन धर्मराज शेट्टी यांनी केले असून हा त्यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीतील पहिलाच प्रकल्प आहे.

या सीरिजमध्ये तन्वी आझमी, महेश मांजरेकर, अंशुमन पुष्कर आणि मोनिका पनवार यांच्याही मुख्य भूमिका आहेत. ‘अक्का’ या सीरिजमध्ये स्त्रिया केवळ कथेचा भाग नसून त्या सत्तेच्या अगदी केंद्रस्थानी आहेत, अशी माहिती नेटफ्लिक्स इंडियाच्या ‘सीरिज हेड’ तान्या बामी यांनी दिली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही