Share

YouTube मध्ये होणार मोठा बदल! Netflix आणि Prime Video सारखे करणार काम

Creators can benefit from YouTube new update. They will get a dedicated show page to showcase their show episodes as well as seasons.

by MHD

Published On: 

New Update in YouTube

YouTube । यूट्यूब वापरणाऱ्यांची (YouTube users) संख्या जास्त आहे. यूट्यूबच्या माध्यमातून अनेकजण लाखो रुपयांची कमाई करत आहेत. यूट्यूब हे फक्त माहितीसाठी मर्यादित राहिले नसून ते कमाई करण्याचे एक साधन बनले आहे. अशातच आता यूट्यूब वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

माहितीनुसार यूट्यूबचा लेआउट पुन्हा डिझाइन करण्यात येणार आहे. तसेच त्याला नेटफ्लिक्स किंवा प्राइम व्हिडिओसारखा (Prime Video) लूक दिला जाण्याची शक्यता आहे. यात शो वेगळ्या ठिकाणी आणि पेड सबस्क्रिप्शन सर्व्हिससाठी एक वेगळा विभाग मिळू शकतो.

याचा फायदा निर्मात्यांना होऊ शकतो. त्यांना त्यांच्या शोचे एपिसोड तसेच सीझन दाखवण्यासाठी डेडिकेटेड शो पेज मिळेल. याची मदत घेऊन सोप्या पद्धतीने प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या क्रिएटर्सचे शो पाहता येतील

यूट्यूबचे नवीन डिझाइन हे प्राइम व्हिडिओ आणि Netflix ला टक्कर देऊ शकते. इतकेच नाही तर यूट्यूबवर अनेक सर्व्हिसमध्ये लॉग-इन करण्याची सुविधा मिळेल. यूट्यूबमध्ये हा बदल कधी पाहायला मिळेल,याची उत्सुकता वापरकर्त्यांना लागली आहे.

याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही. परंतु, येत्या काही महिन्यांमध्ये वापरकर्त्यांना नवीन अपडेट मिळण्याची शक्यता आहे. तसेच येत्या 12 मे पासून यूट्यूबच्या व्हिडिओंमध्ये नैसर्गिक ब्रेकपॉइंट्सवर जाहिराती पाहायला मिळतील.

YouTube New Update

म्हणजेच कंपनी कोणत्याही यूट्यूबवरील सीन किंवा संवादांमधील जाहिराती दाखवणार नाही. असे झाले तर व्हिडिओ पाहण्याचा अनुभव बदलून निर्मात्यांच्या कमाईवरही याचा परिणाम पाहायला मिळू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही