Rohit Sharma । टीम इंडियाने काल ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम फेरीत टीम इंडिया दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजयी संघाला टक्कर देताना पाहायला मिळेल. (Champions Trophy 2025)
हा सामना ९ मार्च रोजी रविवारी होणार आहे. पण सध्या कर्णधार रोहित शर्मा याच्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने माहिती दिली आहे.
“चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना समोर असून मी याबाबत काय बोलू? जर कर्णधार याच पद्धतीने फलंदाजी करत असेल तर तो ड्रेसिंग रुमसाठी मेसेज आहे. त्याच्यात अजून क्रिकेट बाकी आहे. जरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहितने मोठी खेळी केली नाही पण चांगली खेळी केली आहे,” असे गौतम गंभीर याने स्पष्ट केले आहे.
“तज्ज्ञ, पत्रकार फक्त धावा आणि सरासरी बघतात. पण आम्ही त्या खेळाडूने सामन्यात कशी छाप सोडली आहे हे पाहत असतो. जर सर्व काही व्यवस्थित असेल तर त्याने काहीच फरक पडत नाही. आपण ज्या प्रकारचे क्रिकेट खेळू इच्छितो त्यासाठी जर कर्णधार पहिला हात वर करत असल्यास त्यापेक्षा चांगले काही असू शकत नाही,” असेही गौतम गंभीर म्हणाला.
Gautam Gambhir statement about Rohit Sharma Retirement
दरम्यान, गौतम गंभीर याच्या उत्तराने रोहित शर्मा हा निवृत्ती घेणार की नाही हे स्पष्ट होत नसले तरी बीसीसीआय २०२७ वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या तयारीसाठी नवीन कर्णधार शोधत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता रोहित निवृत्ती घेतो की नाही? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :