Share

हार्दिकने रोहितला थेट वॉर्निंग दिली? सोशल मीडियावर खळबळ, अखेर मुंबई इंडियन्सने दिलं ‘हे’ उत्तर!

आयपीएल सुरु होण्यापूर्वीच हार्दिकने रोहित शर्माला थेट वॉर्निंग दिल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर मुंबई इंडियन्सने दोन शब्दांत स्पष्टीकरण दिलं आहे

Published On: 

Mumbai Indians captain Hardik Pandya and Rohit Sharma during IPL match

Mumbai Indians: आयपीएलचा रणसंग्राम सुरु व्हायला अजून काही दिवस बाकी आहेत, पण त्याआधीच क्रिकेटच्या मैदानातून एक मोठी बातमी धडकली आहे. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि त्याचा काय अर्थ काढला जाईल, याचा काहीच नेम नसतो. आताही असंच काहीसं घडलंय, ज्यामुळे थेट मुंबई इंडियन्सच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

येत्या २८ मार्चपासून आयपीएलच्या नव्या हंगामाचा थरार रंगणार आहे. पण स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच एका व्हायरल पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विद्यमान कॅप्टन हार्दिक पंड्याने चक्क लाडक्या ‘हिटमॅन’ला म्हणजेच रोहित शर्माला थेट वॉर्निंग दिल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला होता.

Mumbai Indians च्या गोटात नेमकं काय शिजतंय? वाचा सत्य!

एका युजरने सोशल मीडियावर असा खळबळजनक दावा केला की, यावेळी जर रोहितने खोऱ्याने धावा काढल्या नाहीत, तर हार्दिक त्याला अजिबात संघात खपवून घेणार नाही. सूत्रांच्या हवाल्याने असाही दावा करण्यात आला की, गेल्या १०-१२ वर्षांतील रोहितच्या कामगिरीवर मॅनेजमेंट प्रचंड नाराज आहे.

प्रत्येक सीजनमध्ये रोहित जेमतेम २०० ते ३०० धावाच करतो आणि त्याचा स्ट्राईक रेटही १२० च्या आसपास असतो, असा धक्कादायक उल्लेख या व्हायरल पोस्टमध्ये होता. तो टीममधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या खेळाडूंपैकी एक असल्याने आता मॅनेजमेंटचा संयम सुटल्याची जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु झाली होती.

ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरल्यानंतर अखेर फ्रँचायझीलाच यावर मौन सोडावं लागलं. अधिकृत सोशल मीडिया हँडलवरुन त्यांनी या अफवांची अक्षरशः हवाच काढली. त्यांनी फक्त ‘काही ही’ असे दोन शब्द लिहित हार्दिक पंड्याचा एक मजेशीर GIF शेअर केला. त्यामुळे या सर्व चर्चा निव्वळ अफवा असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

दुसरीकडे, रोहित शर्माचा फलंदाजीचा फॉर्म खरोखरच मागच्या काही काळापासून थोडा चिंतेचा विषय ठरला आहे, हे नाकारता येणार नाही. २०१३ च्या सीजननंतर त्याला एकाही हंगामात ५०० धावांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. गेल्या हंगामातही त्याने १५ सामन्यांत ४१८ धावा केल्या होत्या.

आता २९ मार्चला केकेआर विरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्याने मुंबईचा संघ आपल्या मोहिमेचा श्रीगणेशा करेल. रोहित आणि हार्दिक या दोघांनी मिळून पुन्हा एकदा मुंबईला चॅम्पियन बनवावं, अशीच तमाम क्रिकेट फॅन्सची इच्छा आहे. मैदानावर या दोघांची जुगलबंदी पाहण्यासाठी चाहते आता आतुर झाले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही