Share

T20 World Cup 2026 : शुभमन गिलने संजू सॅमसनला फोटोतून क्रॉप केलं? ‘त्या’ एका दाव्याने क्रिकेटविश्वात मोठी खळबळ!

भारताच्या ऐतिहासिक टी-20 वर्ल्डकप विजयानंतर शुभमन गिलने शेअर केलेल्या एका फोटोवरून मोठा वाद पेटला आहे. त्याने संजू सॅमसनला फोटोतून हटवले आहे का? जाणून घ्या सत्य.

Published On: 

Shubman Gill Post: सॅमसनला फोटोतून हटवलं? सत्य आलं समोर

वर्ल्डकप विजयाचा जल्लोष सुरू असतानाच अचानक दोन स्टार खेळाडूंमध्ये वादाची ठिणगी पडावी, यापेक्षा धक्कादायक काय असू शकतं? सध्या सोशल मीडियावर असाच एक वाद वाऱ्यासारखा पसरतोय.

निमित्त ठरलंय ते टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) याने केलेली एक इन्स्टाग्राम पोस्ट. भारताने T20 World Cup 2026 जिंकल्यानंतर गिलने संघाच्या सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर केला. पण याच फोटोवरून आता इंटरनेटवर अक्षरशः खळबळ उडाली आहे.

Shubman Gill Post

या व्हायरल फोटोमध्ये ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेला संजू सॅमसन (Sanju Samson) कुठेच दिसत नाहीये. चाहत्यांनी जेव्हा या फोटोची तुलना सूर्यकुमार यादवने शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोशी केली, तेव्हा संजू त्यात स्पष्ट दिसला. यानंतर गिलने संजूला जाणीवपूर्वक फोटोतून क्रॉप केल्याचा गंभीर आरोप चाहत्यांनी सुरू केला. गिल स्वतः या वर्ल्डकप संघाचा भाग नसल्याने तो संजूवर जळतो, इथपर्यंत चर्चा सोशल मीडियावर रंगल्या.

पण या व्हायरल दाव्यामागचं सत्य काय? जेव्हा या प्रकरणाची फॅक्ट चेक (Fact Check) करण्यात आली, तेव्हा हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं समोर आलं आहे. गिलने या फोटोसोबत कोणतीही छेडछाड किंवा एडिटिंग केलेली नाही.

पोडियमवर सेलिब्रेशन करताना काही सेकंदांच्या अंतराने अनेक फोटो काढले गेले. गिलने जो फोटो शेअर केला, त्या क्षणी कॅमेऱ्याच्या अँगलमुळे संजू दुसऱ्या खेळाडूच्या मागे पूर्णपणे झाकला गेला होता. तर सूर्याच्या फोटोत तो जसप्रीत बुमराहच्या मागून दिसतोय.

महत्त्वाची बाब म्हणजे, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे आणि आर. अश्विन या खेळाडूंनीही अगदी तोच फोटो शेअर केलाय जो गिलने केला आहे. त्यामुळे गिलने संजूला फोटोतून जाणीवपूर्वक हटवल्याचा दावा केवळ एक अफवा असून, हा सगळा कॅमेरा अँगलचा खेळ असल्याचं आता स्पष्ट झालंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही