Share

MS Dhoni IPL 2026 : थालाने हातात बॅट घेतली अन् गोलंदाजांची झोप उडाली; ‘त्या’ एका व्हिडिओने क्रिकेटविश्वात खळबळ!

एमएस धोनीने आयपीएल २०२६ साठी जोरदार तयारी सुरू केली आहे. बॅटला धार लावतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Published On: 

MS Dhoni IPL 2026: थालाच्या तयारीने खळबळ!

🕒 1 min read

वयाच्या ४३ व्या वर्षीही एखाद्या खेळाडूची एवढी दहशत असू शकते? होय, एमएस धोनीच्या (MS Dhoni) बाबतीत हे शंभर टक्के खरंय. आयपीएल २०२६ चं बिगुल वाजलंय आणि तुमचा लाडका ‘थाला’ पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे.

चेन्नई सुपर किंग्सने (CSK) नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय. यात धोनी स्वतः ग्राइंडरच्या साहाय्याने आपली बॅट घासून तयार करताना दिसतोय. फ्रँचायझीने याला “Master of the Craft” असं कॅप्शन दिलंय. हाच तो व्हिडिओ आहे ज्याने सध्या इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. धोनीची ही तयारी पाहून यंदाच्या IPL 2026 हंगामात भल्याभल्या गोलंदाजांची खैर नाही, हे स्पष्ट होतंय.

MS Dhoni IPL 2026

यंदा २८ मार्चपासून आयपीएलच्या थराराला सुरुवात होणार आहे. पहिला सामना आरसीबी विरुद्ध हैदराबाद असा रंगणार असला तरी सर्वांच्या नजरा चेन्नईच्या पहिल्या सामन्यावर खिळल्या आहेत. जिओहॉटस्टारवर बोलताना भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने एक मोठं विधान केलंय. “धोनीशिवाय सीएसके आणि आयपीएलची कल्पनाच करणं कठीण आहे,” असं पठाण म्हणाला. आता त्याची भूमिका संजू सॅमसन आणि ऋतुराज गायकवाडला भविष्यासाठी तयार करण्याची असेल, असा विश्वासही पठाणने व्यक्त केलाय.

यंदाच्या हंगामात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. संजू सॅमसन आता चेन्नईच्या ताफ्यात आलाय, तर रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे. धोनीचा हा कदाचित शेवटचा हंगाम असू शकतो अशी जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांच्या माहितीनुसार, धोनी सर्व सामने खेळणार असला तरी त्याची प्रत्यक्ष भूमिका संघ व्यवस्थापनच ठरवेल.

धोनीने आतापर्यंत २७८ सामन्यांत ५४३९ धावा कुटल्या आहेत. पाच वेळा संघाला चॅम्पियन बनवणाऱ्या या ‘कॅप्टन कूल’ला यंदा सहावे विजेतेपद मिळवून देत ‘परफेक्ट फेअरवेल’ देण्याची सीएसकेची मोठी रणनीती असू शकते. आता प्रत्यक्ष मैदानात काय होतं, हे पाहणं प्रचंड औत्सुक्याचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!