Share

‘नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब’; Gas Shortage वरून संजय राऊतांचा मोदींवर बोचरा वार!

देशातील भीषण Gas Shortage वरून संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब’ म्हणत त्यांनी कोविड काळातील अपयशाची आठवण करून दिली.

Published On: 

Gas Shortage Sanjay Raut slams PM Modi over cylinder queues

Gas Shortage | नोटबंदीच्या आठवणी पुन्हा एकदा जागत्या झाल्या आहेत. देशात पुन्हा एकदा रांगा लागल्या आहेत, पण यावेळी पैशांसाठी नाही तर अन्नासाठी! आखाती देशांमधील युद्धामुळे देशात भीषण Gas Shortage निर्माण झाला आहे. गॅस एजन्सीबाहेर लागलेल्या सिलेंडरच्या लांबच लांब रांगा आणि हॉटेल चालकांवर चुलीवर स्वयंपाक करण्याची आलेली वेळ, यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. देशातील या गोंधळाच्या परिस्थितीवरून शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“माझ्या घरात हीच परिस्थिती आहे, माझ्या पत्नीला दोन दिवसांपासून सिलेंडर मिळत नाहीये,” असा खळबळजनक दावा राऊत यांनी माध्यमंशी बोलताना केला. सकाळपासून मला ६०-७० लोक भेटले, जे सिलेंडर कुठून मिळवायचा, हेच विचारत होते, असं ते म्हणाले.

Sanjay Raut slams Narendra Modi over Gas Shortage

दिल्लीत सध्या एक घोषणा जोरात गाजत असल्याचं त्यांनी सांगितलं, “नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब.” याचं उत्तर पंतप्रधान मोदींनी दिलं पाहिजे, असा बोचरा टोला राऊतांनी लगावला.

मुंबई, दिल्ली, लखनऊपासून ते थेट जम्मूपर्यंत हीच भीषण स्थिती पाहायला मिळत आहे. नोटबंदीच्या वेळेस ज्या लांबच लांब रांगा लागल्या, त्यात अनेक निष्पाप लोक मारले गेले. तीच भयंकर भीती आता सिलेंडरच्या रांगेत होऊ शकते, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात सरकार अपयशी ठरल्यामुळे देशावर ही परिस्थिती ओढावली आहे, असं ते म्हणाले.

मोदींच्या ‘न घाबरण्याच्या’ आवाहनावर टीका करताना त्यांनी कोविड काळातील भीषण आठवणी काढल्या. मोदींवर खोचक वार करताना राऊत म्हणाले, “गंगा नदीत लोकांची प्रेतं वहात होती, गुजरातमध्ये चिता जाळण्यासाठी स्मशानभूमीत लोकांना जागा मिळत नव्हती.. काय सांभाळलं यांनी?”

हे सरकार जनता विरोधी आहे. लोकांना रांगेत उभं करणं आणि मारणं हा भारतीय जनता पार्टीचा छंद आहे, असा घणाघाती आरोप करत राऊतांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात सरकार अपयशी ठरल्याचा पुनरुच्चार केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install