Share

इराण-अमेरिका युद्ध शिगेला, आता Kim Jong Un मैदानात? उत्तर कोरियाने एकाच वेळी डागली १० क्षेपणास्त्रे!

इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाने १० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याने जगात खळबळ उडाली आहे. हुकूमशहा किम जोंग उन मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे.

Published On: 

Kim Jong Un North Korea firing ballistic missiles during Iran US conflict

🕒 1 min read

Kim Jong Un | जगात कधी तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडेल, हे आता कुणालाच सांगता येत नाही. एकीकडे इराण आणि अमेरिका यांच्यातील भीषण युद्धानं जगाची धाकधूक वाढवली असतानाच, आता एक धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे.

युद्धासाठी नेहमीच एका पायावर तयार असणारे हुकूमशहा किम जोंग उन आता थेट मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, North Korea ने शनिवारी पूर्व किनारपट्टीवरून तब्बल १० बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागली असून संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली आहे.

इराण-अमेरिका युद्धाच्या भडक्यात Kim Jong Un ची उडी, जगाचे वाढले टेन्शन

दक्षिण कोरिया आणि जपानने या धक्कादायक माहितीला दुजोरा दिला आहे. ही सगळी क्षेपणास्त्रे समुद्रात पडल्याचं जपानकडून स्पष्ट करण्यात आलंय. सध्या दक्षिण कोरियाच्या लष्कराचा ‘फ्रीडम शिल्ड’ हा वार्षिक सराव सुरू आहे आणि त्याला उत्तर कोरियाचा नेहमीच विरोध राहिला आहे.

त्यामुळेच, पूर्वापार चालत आलेल्या वैरातून North Korea ने आपली लष्करी ताकद दाखवून दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अणवस्त्रधारी आणि आधुनिक युद्धसामुग्री असलेल्या उत्तर कोरियाने अचानक केलेल्या या क्षेपणास्त्र चाचणीमुळे हे युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दुसरीकडे, इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाचा आज १५ वा दिवस आहे. इराण माघार घेण्यास तयार नसल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता थेट इराणमध्ये सैन्य घुसवण्याची तयारी सुरू केली आहे. तब्बल २५०० मरीन कमांडो आणि एक ‘एम्फिबियस असॉल्ट शिप’ पश्चिम आशियाच्या दिशेने रवाना झाले आहेत.

या सर्व घडामोडींमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून खनिज तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. North Korea ने अमेरिकेच्या या आक्रमक भूमिकेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र शब्दांत निषेध करत, अमेरिकेचे पाऊल बेशरमपणाचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता या संघर्षात पुढे काय होणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!