Share

सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीआधीच केंद्राचा मोठा निर्णय! सोनम वांगचुक यांची १७० दिवसांनंतर तुरुंगातून होणार सुटका

लडाखचे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची १७० दिवसांनंतर सुटका होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वीच केंद्राने त्यांच्यावरील NSA कारवाई मागे घेण्याचा मोठा निर्णय घेतलाय.

Published On: 

Sonam Wangchuk Detention Revoked news central govt decision update

Sonam Wangchuk | लडाखच्या खोऱ्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मोठी धुसफूस सुरू होती, पण आता तिथून एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची अखेर तुरुंगातून सुटका होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांच्यावरील राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) केलेली कारवाई मागे घेतली असून, त्यांना राजस्थानच्या जोधपूर जेलमधून तत्काळ सोडण्याचे आदेश जारी केले आहेत.

Sonam Wangchuk Detention Revoked

गेल्या वर्षी २६ सप्टेंबर २०२५ रोजी वांगचुक यांना NSA अंतर्गत अटक करण्यात आली होती. लडाखला राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये (Sixth Schedule) समावेश करण्याच्या मागणीवरून लेहमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. या हिंसक घटनेत चार जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती.

त्यामुळेच, या हिंसक आंदोलनाला प्रवृत्त केल्याचा आणि तरुणांना भडकावल्याचा ठपका ठेवत वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यांनी तब्बल १७० दिवस तुरुंगात काढले आहेत. असं असलं तरी, आता लडाखमध्ये शांतता आणि परस्पर विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने हा सुटकेचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलंय.

लडाखमध्ये सतत पुकारल्या जाणाऱ्या बंदमुळे तिथलं पर्यटन आणि अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होत होतं. विद्यार्थी आणि नोकरी शोधणाऱ्या तरुणांचे प्रचंड हाल होत होते. स्थानिक नेत्यांशी सकारात्मक चर्चा करण्यासाठी सरकारने एक पाऊल मागे घेतलं आहे.

दुसरीकडे, वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी या अटकेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. येत्या १७ मार्चला या याचिकेवर सुनावणी होणार होती. पण त्याआधीच केंद्राने हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही