🕒 1 min read
Narendra Modi : जगात कुठेही युद्ध सुरू झालं की सगळ्यात आधी इंधनाचे दर भडकतात. सध्या आखाती देशांमध्ये मोठा तणाव पाहायला मिळतोय. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा गौप्यस्फोट करत संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.
पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाल्याने जगभरात तेल आणि गॅस पुरवठ्यावर मोठं सावट आलं आहे. असं असलं तरी, चिंता करण्याचं काहीच कारण नसल्याचं मोदींनी स्पष्ट केलं आहे. आसाममधील एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी हा मोठा दावा केला. भारत केवळ स्वतःचीच नव्हे तर संपूर्ण जगाची ऊर्जेची गरज भागवण्यास सक्षम असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.
Energy Supply India बाबत मोदींचा मोठा दावा
मोदींनी यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. पूर्वी जगात कुठेही संकट आलं की त्याचा थेट फटका आपल्या पुरवठ्याला बसायचा. खतं, डिझेल आणि इंधनाचे दर गगनाला भिडायचे आणि आपला शेतकरी संकटात सापडायचा. या सगळ्या परिस्थितीला केवळ काँग्रेसच जबाबदार असल्याचा घणाघात त्यांनी केला.
काँग्रेस सरकारच्या काळात भारत अनेक बाबतीत परदेशांवर अवलंबून होता. त्यामुळेच शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढत होता. दुसरीकडे, गेल्या दहा वर्षांत भाजप सरकारने आत्मनिर्भरतेवर भर देत देशातील रिफायनरी क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. आज भारत ऊर्जा उत्पादन आणि पुरवठ्याच्या बाबतीत मजबूत देशांपैकी एक बनला आहे. युद्धाच्या नावाखाली काँग्रेस देशात अफवा पसरवत आहे. मोदींनी थेट देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एका जुन्या भाषणाचा दाखला दिला.
“नेहरूंनी लाल किल्ल्यावरून सांगितलं होतं की कोरियातील युद्धामुळे देशात महागाई वाढली आहे. ते देश कुठे आहेत आणि त्याचा आपल्या महागाईशी काय संबंध?” असा सवाल मोदींनी विचारला.
आजचे काँग्रेस नेतेही त्याच जुन्या पद्धतीने जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळेच आता जागतिक ऊर्जा बाजारात भारत कशी मुसंडी मारतोय, हे पाहणं खरोखरच उत्सुकतेचं ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘छावा’ फेम अक्षय खन्नाला मीच ॲक्टिंग शिकवली! प्रसिद्ध अभिनेत्याच्या दाव्याने बॉलिवूडमध्ये उडाली खळबळ
- डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी, इराणचं आज काय होणार? आखाती देशांत मोठी खळबळ
- ट्रम्प यांचा सर्वात मोठा निर्णय, भारत-अमेरिका व्यापार करारात विघ्न; नेमकं काय घडलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











