Share

डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी, इराणचं आज काय होणार? आखाती देशांत मोठी खळबळ

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट धमकी दिली आहे. आखाती देशांत मोठी खळबळ उडाली असून युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

Published On: 

India-US Trade Deal : ट्रम्प यांची मोठी घोषणा! मोदींचं कौतुक करत दिली गुड न्यूज

Donald Trump: राजकारणात आणि युद्धात कधी काय होईल, हे कुणीच सांगू शकत नाही. सध्या आखाती देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला असून आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘इराणचे आज काय हाल होतील, हे फक्त बघा’ अशी थेट धमकीच ट्रम्प यांनी दिल्याने जागतिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आजचा चौदावा दिवस आहे. दोन्ही बाजूंकडून हल्ल्यांची तीव्रता वाढली आहे. इराणचे नवे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यांनी अमेरिकेला त्यांचे मध्य पूर्वेतील लष्करी तळ बंद करण्याचा थेट इशारा दिला आहे. असं असलं तरी, अमेरिकेने अधिक आक्रमक भूमिका घेत इराणला पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची भाषा वापरली आहे.

Donald Trump on Israel Iran War

ट्रम्प यांनी अत्यंत प्रखर शब्दांत इराणवर हल्लाबोल केला आहे. आपण इराणच्या दहशतवादी राजवटीला लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे नष्ट करत असल्याचा दावा त्यांनी केला. इराणचे नौदल, हवाई दल, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट होत आहेत, असंही ते म्हणाले. आमच्याकडे अतुलनीय अग्निशक्ती, अमर्याद दारूगोळा आणि भरपूर वेळ आहे, असे ट्रम्प म्हणाले.

गेल्या ४७ वर्षांपासून इराण जगभरातील निष्पाप लोकांना मारत आहे, असा आरोप ट्रम्प यांनी केला. ‘आता अमेरिकेचा ४७ वा राष्ट्राध्यक्ष म्हणून मी त्यांना मारत आहे आणि ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे’, असं धक्कादायक विधान त्यांनी केलं आहे. यामुळे येत्या काळात संघर्ष आणखी चिघळण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. न्यूयॉर्क टाईम्ससारख्या माध्यमांवर टीका करत ट्रम्प यांनी आपणच युद्ध जिंकत असल्याचा दावा केला आहे.

दुसरीकडे, अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार इराणची राजवट सहजासहजी हार मानणार नाही. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरून महत्त्वाची चर्चा केली आहे. त्यांनी या युद्धात नागरिकांचे जाणारे बळी आणि नुकसानीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळेच आता पुढे नेमकं काय घडतंय आणि या युद्धाचं काय होणार, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install