Share

कोल्हापुरात चक्क गॅसअभावी लग्न पुढे ढकलण्याची वेळ! तीन आमदारांच्या घरात मात्र लगीनघाई; नेमकं चाललंय काय?

युद्धाच्या भीतीने कोल्हापुरात गॅसची मागणी वाढली असून व्यावसायिक गॅस बंद करण्यात आला आहे. पुरवठा अधिकाऱ्यांनी प्रसंगी लग्न पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे.

Published On: 

Kolhapur Gas Shortage impact on weddings and commercial use

Kolhapur Gas Shortage: आयुष्यातील सर्वात मोठा क्षण म्हणजे लग्न, पण ऐन लग्नसराईत गॅसचं सिलिंडरच मिळालं नाही तर? वाचून धक्का बसेल, पण कोल्हापुरात आता चक्क गॅसअभावी लग्न पुढे ढकलण्याची वेळ आली आहे.

इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात भडकलेल्या युद्धाचे चटके आता थेट कोल्हापूरकरांना बसू लागले आहेत. युद्धाच्या भीतीने लोकांनी गॅस बुकिंगसाठी एकच झुंबड उडवून दिली असून, प्रशासनाने हॉटेल आणि उद्योगांचा व्यावसायिक गॅस पूर्णपणे बंद करून तो घरगुती वापराकडे वळवला आहे.

Kolhapur Gas Shortage मुळे लग्नसोहळ्यांवरही मोठं संकट

या भयानक परिस्थितीवर जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे. “ज्यांच्याकडे गॅसची सोय नाही, त्यांनी थोडंसं लग्न पुढे ढकललं तर काही हरकत नाही,” असा थेट आणि धक्कादायक सल्ला त्यांनी कॅटरर्स आणि नागरिकांना दिला आहे.

दुसरीकडे, जिल्ह्यात तब्बल तीन आमदारांच्या घरात सध्या मोठी लगीनघाई सुरू आहे. त्यांच्याकडे आधीचाच कमर्शियल साठा उपलब्ध असल्याने त्यांची लग्नं मात्र निर्विघ्न पार पडतील, असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे यावरून आता राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली आहे.

असं असलं तरी, कोल्हापूरकरांनी अजिबात घाबरून जाऊ नये. जिल्ह्याला रोज लागणारे २८ ते २९ हजार सिलिंडर आणि ३ दिवसांचा ‘बफर स्टॉक’ पूर्णपणे उपलब्ध आहे. देशभरातून एकाच वेळी बुकिंग होत असल्याने सर्व्हरवर ताण आलाय, त्यामुळेच ग्राहकांना ओटीपी (OTP) येण्यास अडचण येत असल्याची माहिती समोर आली आहे.

या वाढत्या गर्दीमुळे आता शहरी भागात २१ ऐवजी २५ दिवसांनंतर, तर ग्रामीण भागात तब्बल ४५ दिवसांनंतरच नवीन सिलिंडर बुक करता येणार आहे. पाईपलाईन गॅस असलेल्या कोल्हापूर आणि इचलकरंजीतील ११ हजार ग्राहकांनीही बुकिंगचा धडाका लावलाय. त्यांच्यावर आता प्रशासनाची करडी नजर असणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही