‘लहान मुलं गुदमरतायत…’, BMC वर संतापली दीपिका पादुकोण; म्हणाली मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं…..

मुंबईच्या खालावलेल्या हवेवर दीपिका पादुकोणने संताप व्यक्त केला आहे. ‘लहान मुलं गुदमरतायत’, असं म्हणत तिने थेट बीएमसीला जाब विचारलाय.

Published On: 

Deepika Padukone Post: BMC वर संतापली मस्तानी!

मुंबईची हवा सध्या इतकी विषारी झालीये की मोकळा श्वास घेणंही कठीण झालंय, याचाच प्रत्यय आता थेट बॉलिवूडच्या ‘मस्तानी’ला आलाय. नुकतीच एका गोंडस मुलीची आई झालेली दीपिका पादुकोण सध्या एका अत्यंत गंभीर मुद्द्यावरून चर्चेत आली आहे.

मुलीच्या जन्मानंतर आठ तासांच्या शिफ्टची मागणी केल्याने दीपिकाला नुकतंच ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. काही सिनेमांमधून तिला डच्चू मिळाल्याचीही चर्चा रंगली होती. पण कोणत्याही वादाची पर्वा न करता तिने आता थेट मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर प्रशासनाला जाब विचारला आहे.

Deepika Padukone Post

गुरुवारी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १५० च्या पार गेल्याचं समोर आलं. हा आकडा आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. याच वाढत्या समस्येवर बोट ठेवत दीपिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली असून थेट मुंबई महानगरपालिकेला (BMC) टॅग केलं आहे.

हवेच्या खराब गुणवत्तेचा स्क्रीनशॉट शेअर करत दीपिकाने आपला संताप व्यक्त केलाय. “मुंबईत राहणारे लोक आणि विशेषतः लहान मुलं या प्रदूषित हवेमुळे गुदमरतायत. हे कसं योग्य असू शकतं?” असा परखड सवाल तिने उपस्थित केला आहे. तिच्या या रोखठोक भूमिकेमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली असून प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी तिने केली आहे.

याआधी रिचा चढ्ढा आणि सयामी खेर यांनीही याच मुद्द्यावर आवाज उठवला होता. सध्या Deepika Padukone Concern Over Mumbai Air Quality हा विषय इंटरनेटवर चांगलाच तापला आहे. दीपिकाच्या कामाबद्दल सांगायचं तर, ती लवकरच शाहरुख खानसोबत ‘किंग’ (King) सिनेमात आणि दिग्दर्शक ॲटलीच्या आगामी तेलुगू ॲक्शन चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत दिसणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही