Share

सोने-चांदीच्या दरात अचानक उलथापालथ; १० ग्रॅमची किंमत पाहून थक्क व्हाल!

आखाती देशांतील युद्धामुळे जागतिक बाजारात खळबळ उडाली असून, आज भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात किंचित घसरण पाहायला मिळाली.

Published On: 

Gold Silver Rate Today: युद्धाचा भडका, सोने-चांदीचे दर घसरले!

जगात कुठेही युद्ध भडकलं की त्याचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाचा आज १४ वा दिवस आहे. या वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात अक्षरशः खळबळ उडाली असून, खनिज तेलाच्या पुरवठ्यात मोठा अडथळा निर्माण झालाय. याचे थेट परिणाम आता आपल्या सराफा बाजारात (Gold Silver Rate Today) दिसायला लागले आहेत.

या सगळ्या घडामोडींचा परिणाम म्हणून आज (१३ मार्च) भारतीय सराफा बाजारात किंचित घसरण पाहायला मिळाली. तुम्ही जर आज खरेदीचा विचार करत असाल तर Gold Rate Today नक्की तपासा. सकाळी साडेदहाच्या सुमारास एमसीएक्स (MCX) वर सोन्याचे वायदे ०.११ टक्क्यांनी घसरून ₹१,६०,०९९ प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होते. कालच्या तुलनेत यात जवळपास १७२ रुपयांची घसरण झाली आहे. सुरुवातीच्या सत्रात हाच दर ₹१,६०,४०१ पर्यंत पोहोचला होता.

Gold Silver Rate Today

दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी उलथापालथ सुरूच आहे. एमसीएक्सवर चांदी ०.२१ टक्क्यांनी खाली आली असून ती ₹२,६७,३९७ प्रति किलोवर ट्रेड करत होती. आज मुंबईत १० ग्रॅम चांदी खरेदी करायची असेल, तर तुम्हाला २,७९९ रुपये मोजावे लागतील. चेन्नईमध्ये हाच दर सर्वाधिक म्हणजे २,९०० रुपयांवर पोहोचलाय.

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव आजही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,६१,२४० आणि २२ कॅरेटसाठी ₹१,४७,८०० आहे. दिल्लीत हेच दर अनुक्रमे ₹१,६१,३९० आणि ₹१,४७,९३० असे आहेत. चेन्नईमध्ये तर सोन्याने ₹१,६२,५६० चा उच्चांकी पल्ला गाठला आहे. युद्धाची परिस्थिती पाहता आगामी काळात हे दर आणखी किती बदलतील, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही