कोल्हापूर, 10 नोव्हेंबर: कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या घडामोडींकडे लागले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत या निवडणूक प्रक्रियेला सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
काल काढण्यात आलेल्या ‘संघर्ष मोर्चा’नंतर सायंकाळी न्यायालयाचा निकाल आला. या निकालाचा सन्मान करत आजची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी कार्यकर्त्यांनी संयम बाळगण्याच्या सूचना सतेज पाटील यांनी दिल्या आहेत. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांच्या गटाकडून शशिकांत पाटील सुयेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे.
दुसरीकडे, या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीकडूनही जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. महायुतीचे १२ निर्वाचित आणि ४ शासन नियुक्त असे एकूण १६ संचालक एकत्र आले असल्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपण आपली पुढील रणनीती जाहीर करणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पक्ष वाढवायचा की संपवायचा? आपल्याच पालकमंत्र्यांवर एकनाथ शिंदे संतप्त
- सुनील तटकरे पुण्यात, सुनेत्रा पवारांची घेणार भेट; विलिनीकरणाच्या चर्चेसह अर्थखात्यावर केले थेट भाष्य
- गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईक आणि संजय राऊतांची भेट
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








