‘गरज नसेल तर सोने खरेदी करू नका’; PM मोदींचं आवाहन

पंतप्रधान मोदी यांच्या सोने खरेदी टाळण्याच्या आवाहनादरम्यान MCX वर सोने ₹310 आणि चांदीच्या दरातही घसरण झाली.

Published On: 

PM Modi gold buying appeal

Sliver-Gold Rate – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सोमवारी सोने (Gold) खरेदीबाबत एक महत्त्वाचे आवाहन केले. त्यांनी लोकांना गरज असल्याशिवाय सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले. तसेच, परदेशात जाऊन विवाह सोहळे आयोजित करणे टाळावे, असेही त्यांनी सांगितले. सध्या परदेश दौऱ्यावर असलेल्या मोदींनी सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ शेअर करून हे आवाहन केले. सोने खरेदीबाबत सरकारकडून सातत्याने हे आवाहन (Appeal) केले जात आहे.

परकीय चलन साठ्यावरील ताण कमी करण्यासाठी अशी पावले उचलली जात आहेत. सरकार सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे. यापूर्वी आयात शुल्क ६% होते. सोने खरेदीला आळा घालण्यासाठी सरकारने ते वाढवून १५% केले होते, परंतु या निर्णयामुळे खरेदीवर नियंत्रण आले नाही. उलट, सरकारला बेकायदेशीर व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.

PM Modi gold buying appeal

आयात शुल्क कमी करण्यासाठी पावले उचलली जात आहेत, ज्यामुळे सोन्याच्या दरात थेट घट होऊ शकते. मोदींचे हे आवाहन या संभाव्य निर्णयाच्या पार्श्वभूमीवर आले आहे. आज, १ सप्टेंबर रोजी, MCX वर सोने आणि चांदीच्या दरात घट दिसून येत आहे. सोन्याच्या दरात ३१० रूपयांची घसरण झाली असून, ते प्रति १० ग्रॅम १,५४,१५० रूपयांवर व्यवहार करत आहे.

आज चांदीच्या दरातही घट झाली आहे. चांदीचा दर प्रति ग्रॅम ५ रूपयने कमी होऊन २५० रूपयांवर आला आहे. परिणामी, १० ग्रॅम चांदीचा दर २,५०० रूपय झाला आहे, तर १०० ग्रॅमचा दर २५,००० रूपयांवर पोहोचला आहे. एक किलो चांदीच्या दरात ५,००० रूपयांची घट होऊन तो २,५०,००० रूपये झाला आहे. नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर चांदीचे दर काहीसे नरमल्याचे दिसून आले.

बाजार विश्लेषक टोनी सायकामोर यांच्या मते, ‘फेड’ (Fed) अधिकारी केविन वॉर्श यांची कठोर भूमिका (hawkish stance) आणि ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मधील वाढता तणाव यांचा सोन्याच्या दरांवर परिणाम झाला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली असून, त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवरही झाला आहे. सोन्याचे दर पुन्हा एकदा घसरताना दिसत आहेत. चांदीच्या दरातही घट नोंदवण्यात आली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही