Share

५६ इंच छातीवाले तरुणांना का घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल

दिल्लीकडे जाणाऱ्या आंदोलक तरुणांवर केंद्र सरकारने केलेल्या कारवाईवरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Published On: 

Gas Shortage Sanjay Raut slams PM Modi over cylinder queues

प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: दिल्लीकडे जाणाऱ्या आंदोलक तरुणांवर केंद्र सरकारने केलेल्या कारवाईवरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘जे स्वतःला ५६ इंचाची छाती असलेले म्हणवतात, ते या देशातील तरुणांना का घाबरले आहेत?’ असा थेट सवाल राऊत (Sanjay Raut) यांनी उपस्थित केला आहे. या कारवाईला त्यांनी जनतेचे बंड म्हटले असून अशा दडपशाहीने हे आंदोलन थांबवता येणार नसल्याचा इशारा दिला आहे.

आंदोलकांना रोखण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. दिल्लीकडे जाणारे सर्व रस्ते सील करण्यात आले असून, विमाने वळवली जात आहेत आणि रेल्वे थांबवून तरुणांना अटक केली जात आहे. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची अशी नाकेबंदी ब्रिटिश काळातही झाली नव्हती, असे राऊत म्हणाले. या परिस्थितीत हजारो वाहने अडकून पडली असली तरी, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना (रेखा गुप्ता) काय चालले आहे याबाबत काहीच माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला.

याच कारवाईचा संदर्भ देत राऊत यांनी मोदी सरकारच्या पतनाची भविष्यवाणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे पतन सुरू झाले असून, मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत हे सरकार अखेरचा श्वास घेईल व त्यानंतर देशात एक राष्ट्रीय सरकार स्थापन होईल, असा दावा त्यांनी केला. जंतरमंतरवर यापूर्वी झालेल्या सीजेपी आंदोलनाचा धसका घेतल्यानेच सरकार आता अशी कारवाई करत असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही