प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट देणारे नाना केवळ एक उत्कृष्ट अभिनेतेच नव्हते, तर त्यांनी थेट कारगिल युद्धातही सहभाग नोंदवला होता. एका जुन्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या या थरारक अनुभवाचा किस्सा सांगितला होता.
‘प्रहार’ चित्रपटाच्या वेळी केंद्र सरकारची परवानगी घेऊन नाना पाटेकर यांनी जवळपास तीन वर्षे मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये घालवली होती. तिथे त्यांनी कमांडो कोर्स आणि नेमबाजीचे प्रशिक्षण घेतले, तसेच ६ ते ८ महिन्यांच्या कमिशन प्रक्रियेचा अनुभवही मिळवला. पुढे जेव्हा कारगिल युद्धाला सुरुवात झाली, तेव्हा दिल्लीत एक फुटबॉल सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात कपिल देव खेळाडूंचे तर नाना अभिनेत्यांचे (ज्यात शाहरुख खान आदींचा समावेश होता) नेतृत्व करणार होते. मात्र, देशावर युद्धाचे सावट असल्याने त्यांना तिथे खेळणे योग्य वाटले नाही.
नाना पाटेकर यांचे तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याशी चांगले मैत्रीचे संबंध होते. नानांनी थेट फर्नांडिस यांना फोन करून युद्धभूमीवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. सुरुवातीला फर्नांडिस यांनी आश्चर्य व्यक्त केले, पण जेव्हा नानांनी त्यांना आपल्या तीन वर्षांच्या लष्करी अनुभवाविषयी सांगितले, तेव्हा त्यांनी तातडीने जाण्यास परवानगी दिली. ‘कधी जायचे?’ या प्रश्नावर ‘आजच’ असे सांगून त्याच दिवशी संध्याकाळी नाना युद्धासाठी रवाना झाले.
श्रीनगर विमानतळावर कर्नल बदाणी त्यांना घ्यायला आले होते. तिथून कुपवाड्याला जाण्यासाठी दोन मार्ग होते. कुपवाडा सीमेजवळून पाकिस्तानातील घरेही स्पष्ट दिसतात. दहशतवाद्यांनी जवळच्या मार्गावर सुरुंग पेरले असल्याने, कर्नल बदाणी यांनी बारामुल्लामार्गे जाणाऱ्या लांबच्या आणि सुरक्षित रस्त्याने जाण्याचा सल्ला दिला. मात्र, कर्नल स्वतः जवळच्या मार्गानेच आल्याचे समजल्यावर नानांनी तोच रस्ता निवडला. ‘जर तुम्हाला काही झाले नाही, तर मलाही काही होणार नाही. आपण सगळे याच मार्गाने जाऊ, जे होईल ते सर्वांना होईल,’ असे सांगत नाना पाटेकर त्याच धोकादायक मार्गाने कुपवाड्याच्या दिशेने पुढे गेले.
📌 महत्वाच्या बातम्या
- दीपके दिल्लीत, राहुल गांधी चेन्नईत; काँग्रेसने CJP च्या आंदोलनाकडे पाठ फिरवण्यामागे आहेत ही ३ कारणे
- पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिजीत दिपकेंचा मानसिक छळ? सीजेपीच्या आरोपाने खळबळ
- राज ठाकरेंचा मोदी-शाहांवर घणाघात, म्हणाले- ‘या देशाने सगळ्यांचा माज उतरवलाय!’
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









