मुख्यमंत्री झाल्यास काय कराल? मकरंद अनासपुरेंच्या प्रश्नावर नाना पाटेकरांनी गडकरींसमोरच दिलेलं ‘ते’ उत्तर

मुख्यमंत्री केल्यास काय कराल, या मकरंद अनासपुरेंच्या प्रश्नावर नाना पाटेकरांनी नितीन गडकरींसमोरच दिलेल्या स्पष्ट उत्तराचा जुना किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे.

Published On: 

Nana Patekar Death Details

प्रतिनिधी, 19 ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीत कधीही न भरून निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या संस्मरणीय भूमिकांसोबतच नाना पाटेकर हे सामाजिक कार्यातही नेहमीच अग्रेसर राहिले. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागात मोठे कार्य उभे करत शेतकऱ्यांना भक्कम आधार दिला. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्याशी संबंधित अनेक जुने किस्से आणि आठवणी समोर येत आहेत.

असाच एक खास किस्सा ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितला होता. एकदा एका निर्मात्याने नाना पाटेकर यांना चित्रपटाची ऑफर दिली होती. त्यावर नानांनी त्या निर्मात्याला आपल्या घरी बोलावून मटण खाऊ घातले आणि त्यानंतर चक्क त्यालाच उष्टी भांडी घासायला लावली होती. रावल यांनी हा किस्सा सांगताना संबंधित निर्मात्याचे नाव मात्र गुलदस्त्यात ठेवले.

राजकारणाविषयी नाना पाटेकर यांची भूमिका नेहमीच स्पष्ट असायची. राजकीय वर्तुळात अनेक नेत्यांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असले तरी, एखादी गोष्ट खटकल्यास ते समोरच्या व्यक्तीचे पद न पाहता थेट बोलून मोकळे व्हायचे. असाच एक प्रसंग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित असलेल्या एका कार्यक्रमात घडला होता. या कार्यक्रमात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नानांना एक अनपेक्षित प्रश्न विचारला.

“जर तुम्हाला मुख्यमंत्री केलं तर तुम्ही काय कराल?” असा प्रश्न अनासपुरे यांनी विचारला होता. त्यावर एका क्षणाचाही विलंब न लावता नानांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. “ते मला जमणारच नाही, मी काहीही करणार नाही, तो माझा पिंडच नाही,” असे नाना पाटेकर यांनी गडकरींच्या उपस्थितीत थेट सांगून टाकले होते.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

नाना पाटेकर यांनी 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठे कार्य उभे करत शेतकऱ्यांना आधार दिला.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही