राष्ट्रवादीच्या आंदोलनात शिवसेना आमदार संजय गायकवाड! स्वतःच्याच सरकारला दिला घरचा आहेर

बुलढाण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आंदोलनात सहभागी होत शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या मदतीवरून स्वतःच्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.

Published On: 

Shiv Sena MLA Sanjay Gaikwad participating in NCP protest at Buldhana

बुलढाणा, 19 ऑक्टोबर: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवरून सत्ताधारी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी थेट सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. बुलढाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) आंदोलनात सहभागी होत गायकवाड यांनी, सरकारने जाहीर केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा असल्याची बोचरी टीका केली.

शासनाच्या या अपुऱ्या मदतीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ अशी घोषणाबाजी करत आंदोलन पुकारले होते. याच वेळी आमदार संजय गायकवाड यांचे वाहन तेथून जात होते. आंदोलकांनी त्यांना थांबवून आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली आणि त्यांच्या हातात भोपळा दिला. गायकवाड यांनीही या विनंतीला मान देत माध्यमांशी संवाद साधला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कोणत्याही पक्षाने आंदोलन करणे चांगलेच असल्याचे संजय गायकवाड यावेळी म्हणाले. “सरकारने जी मदत जाहीर केली ती शेतकऱ्यांची चेष्टा आहे. सरकारने सर्व नियम बाजूला ठेवून, गेल्या वेळी केली होती तशी तीन पटीने मदत शेतकऱ्याला करावी. सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा करू नये,” अशी स्पष्ट मागणी त्यांनी यावेळी केली.

दुसरीकडे, वाशिम जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची दसऱ्याच्या तोंडावर मोठी निराशा झाली आहे. नैसर्गिक संकटामुळे सोयाबीन आणि तूर पीक हातातून गेल्यानंतर, मंगरुळपीर तालुक्यातील घनश्याम भगत यांनी आपल्या दोन एकर शेतात मोठ्या आशेने झेंडूची लागवड केली होती. यातून किमान शेतीचा खर्च निघेल, अशी त्यांना अपेक्षा होती.

चांगला भाव मिळण्याच्या आशेने भगत यांनी दोन वाहनांतून झेंडूची फुले घेऊन तब्बल ३०० किलोमीटरहून अधिक प्रवास करत भंडाऱ्याची बाजारपेठ गाठली. मात्र, तेथे झेंडूला अवघा ५ रुपये प्रति किलो असा नीचांकी दर मिळाला. वाशिमहून भंडाऱ्यापर्यंतच्या प्रवासासाठी त्यांना दोन वाहनांचे ४८ हजार रुपये भाडे द्यावे लागले, तर फुलविक्रीतून अवघे ३० हजार रुपये हाती आले. त्यामुळे या शेतकऱ्याला १८ हजार रुपयांचा थेट आर्थिक फटका बसला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

आमदार संजय गायकवाड यांनी सरकारने जाहीर केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा असल्याची टीका केली आणि सरकारने सर्व नियम बाजूला ठेवून गेल्या वेळी केली होती तशी तीन पटीने मदत शेतकऱ्याला करावी अशी मागणी केली.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही