प्रतिनिधी, 19 ऑक्टोबर: राज्यामध्ये सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचा एक आमदार भाजपच्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असल्याची चर्चा सुरू झाली आहे. काल मंत्री जयकुमार गोरे यांनीही पवार गटाचे दोन आमदार भाजप उमेदवारांना पाठिंबा देत असल्याचा दावा केला होता. या सर्व घडामोडींवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली असून, संबंधित आमदारावर खुद्द शरद पवार कारवाई करतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी या दाव्यावर भाष्य केले. काही लोक व्यासपीठावर दिसतात, मात्र नक्की कोण आहेत यावर शरद पवार योग्य तो निर्णय घेतील, असे ते म्हणाले. याचवेळी त्यांनी विकास निधीच्या नावाखाली पालकमंत्र्यांकडे एक-दोन कोटींसाठी भीक मागत असलेल्या आमदारांवर कडक शब्दांत निशाणा साधला. विरोधात उभे राहण्यासाठी नेत्यांमध्ये धमक असावी लागते, मात्र ती सध्याच्या या नेत्यांमध्ये दिसत नसल्याचा टोला त्यांनी लगावला.
राज्यातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर बोलताना रोहित पवार यांनी टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाचा तसेच बाबा सिद्दीकी आणि प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा संदर्भ दिला. काल टायगर श्रॉफ आणि बारामतीमध्ये गोळीबार झाल्याचे सांगत, राज्यात अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी आपला पदभार दुसऱ्याकडे सोपवण्याची मागणी त्यांनी केली. राज्यात गोळीबाराच्या घटना घडू नयेत यासाठी ठोस काम झाले पाहिजे. पोलिसांनी केवळ ‘व्हीआयपी’ लोकांनाच नव्हे, तर सर्वसामान्यांनाही संरक्षण दिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
एकनाथ शिंदे यांनी घरी भेट न दिल्याने राम पूर्णेकर यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवरही रोहित पवारांनी मत मांडले. शिंदे यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घ्यायला काहीच हरकत नाही, यातून त्या कुटुंबाला अभय मिळेल असे ते म्हणाले. यासोबतच बार्शीचे भाजप आमदार राजेंद्र राऊत यांच्यावरही त्यांनी टीका केली. बार्शीतील सामान्य नागरिक प्रामाणिक असले तरी तिथले नेते मात्र ‘करामती’ आहेत, असे सांगत ‘सीईटी’चे कनेक्शन बार्शीशी असून ते आपण शोधून काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
आमदार जितेंद्र आव्हाड यांना आलेल्या धमकीच्या प्रकरणावर रोहित पवारांनी तीव्र चिंता व्यक्त केली. हा थेट कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असून अशा प्रकारच्या धमक्या येणे अत्यंत गंभीर असल्याचे ते म्हणाले. राज्यात निर्माण झालेल्या या भीतीदायक वातावरणामुळे सुरक्षेसाठी आपणही खासगी सिक्युरिटी ठेवल्याचा खुलासा त्यांनी यावेळी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- आधी जित्याला गोळ्या घालेन, नंतर तुला; आमदार जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी
- अंबानींच्या नवरात्री मेळ्यात धोनीचा साक्षीसोबत खोडकर प्रँक; व्हिडिओ व्हायरल
- भाजपला तामिळनाडूत मोठा धक्का; ‘सिंघम’ के. अन्नामलाई स्थापन करणार नवा राजकीय पक्ष
Quick Answers
काही लोक व्यासपीठावर दिसतात, मात्र नक्की कोण आहेत यावर खुद्द शरद पवार योग्य तो निर्णय आणि कारवाई करतील, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
शरद पवार गटाचे दोन आमदार भाजप उमेदवारांना पाठिंबा देत असल्याचा दावा मंत्री जयकुमार गोरे यांनी केला होता.
राज्यात गोळीबाराच्या घटना घडत असल्याने आणि अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी आपला पदभार दुसऱ्याकडे सोपवावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
बार्शीतील नेते 'करामती' असून 'सीईटी'चे कनेक्शन बार्शीशी आहे आणि ते आपण शोधून काढणार असल्याचे रोहित पवार यांनी जाहीर केले.
राज्यात निर्माण झालेल्या भीतीदायक वातावरणामुळे सुरक्षेसाठी आपण स्वतः खासगी सिक्युरिटी ठेवल्याचा खुलासा रोहित पवार यांनी केला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






