पलानी, 19 ऑक्टोबर: भाजपचे तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई (K Annamalai) यांनी आपला स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पलानी येथे एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या पावलामुळे तामिळनाडूत आपले वर्चस्व निर्माण करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून त्यांच्या विस्ताराच्या आशांना खीळ बसू शकते.
या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षांतर्गत नाराजीमुळे अन्नामलाई यांनी भाजप आणि आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळीच त्यांनी नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता ‘वुई दी लीडर्स’ या आंदोलनाच्या माध्यमातून ते आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहेत. यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात नवी समीकरणे उदयाला येण्याची चिन्हे दिसत आहेत.
सध्या अन्नामलाई यांच्या ‘वुई दी लीडर्स’ आंदोलनाद्वारे राज्यात विविध सामाजिक आणि जनकल्याणकारी कामे हाती घेण्यात आली आहेत. याअंतर्गत त्यांची एक टीम लोकांमध्ये जागृती निर्माण करून नशाबंदीवर काम करत आहे. तर, दुसरी टीम पर्यावरण संरक्षणाच्या मुद्द्यावर काम करत आहे.
राजकारणात येण्यापूर्वी अन्नामलाई प्रशासकीय सेवेत होते. ते २०११ च्या कर्नाटक कॅडरचे आयपीएस अधिकारी होते. अत्यंत कडक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी असल्यामुळे त्यांना ‘कर्नाटकचा सिंघम’ म्हटले जायचे. २०१९ मध्ये आयपीएस पदाचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत वेगाने फिरत तामिळनाडूत पक्षाचा जनाधार वाढवला होता. आता नव्या पक्षाची स्थापना करून ते आपली दुसरी राजकीय इनिंग कशी खेळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मोहम्मद शमीला डावलून बुमराहला विशेष वागणूक का? मोहम्मद कैफने विचारला बीसीसीआयला जाब
- टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण: ‘ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांत…’, संजय शिरसाटांचा संजय राऊतांना पलटवार
- मोदी सरकार कोसळून नवा पंतप्रधान येणार; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ
Quick Answers
भाजपचे तामिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी आपला स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा पलानी येथील एका कार्यक्रमात केली आहे.
अन्नामलाई 'वुई दी लीडर्स' या आंदोलनाच्या माध्यमातून आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहेत.
या आंदोलनांतर्गत एक टीम लोकांमध्ये जागृती निर्माण करून नशाबंदीवर काम करत आहे, तर दुसरी टीम पर्यावरण संरक्षणाच्या मुद्द्यावर काम करत आहे.
राजकारणात येण्यापूर्वी अन्नामलाई प्रशासकीय सेवेत २०११ च्या कर्नाटक कॅडरचे आयपीएस अधिकारी होते. त्यांना 'कर्नाटकचा सिंघम' म्हटले जायचे, आणि २०१९ मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







