नाना-तनुश्रीच्या २००८ मधील वादावर महेश मांजरेकरांचा मोठा खुलासा; म्हणाले, ‘सेटवर काहीही…’

नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्यातील २००८ च्या जुन्या वादावर अभिनेते महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया देत सेटवर नेमकं काय घडलं होतं, हे सांगितलं आहे.

Published On: 

Mahesh Manjrekar talking about Nana Patekar and Tanushree Dutta controversy

प्रतिनिधी, 14 नोव्हेंबर: ८ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने २००८ मधील एका जुन्या प्रकरणावरून त्यांच्यावर पुन्हा आरोप केले. या सर्व वादावर आता अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत स्पष्ट प्रतिक्रिया दिली असून, त्या दिवशी सेटवर नेमकं काय घडलं होतं, याचा खुलासा केला आहे.

२००८ साली एका आयटम साँगच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने केला होता. नानांनी त्यावेळी असं काहीच घडलं नसल्याचं अनेकदा स्पष्ट केलं होतं. आता महेश मांजरेकर यांनीही सेटवरील लोकांचा संदर्भ देत, त्या दिवशी काहीही घडलं नसल्याचं सांगितलं आहे.

एका मुलाखतीत नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा देताना मांजरेकर म्हणाले, ‘काहीही करुन माझ्याकडे बघा अशीही काही लोक असतात. सगळ्यांनी कौतुक केलं आणि एकाने केलं नाही की त्याच्याकडे बघतात की नाही. तर त्यामुळे ते ठिक आहे. प्रत्येकजण म्हणतो ते परत जुनं प्रकरण काढतात. अरे त्याला किती वर्ष झाली. मला माहितीये ना नाना. त्या सेटवर काय झालं? तिकडे कोण कोण होते? सगळ्यांनी मला सांगितलं. पण आता ते… काय होतं ना लोक त्यालाही हायलाईट करायला तयार असतात. उगाच… फॉर नो रिझन त्याने खूप सफर केलं आहे त्यावेळेला. काहीच कारण नसताना.’

या प्रकरणावर अधिक बोलताना ते पुढे म्हणाले, ‘त्या सेटवर असलेले सगळेजण मला माहिती आहेत. त्यांनी सांगितलं काहीही झालं नव्हतं. पण मला असे वाटते की आता त्याकडे दुर्लक्ष करा… ठिक आहे… त्याच्यावर फार विचार करायचा नाही. यावर प्रत्येकाचे मत आहे आणि प्रत्येकाचे वेगळे मत आहे. राग येतो पण काय करणार? त्याला इलाज काय आहे?’

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही