नवरात्राआधी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप? ठाकरेंचे 14 आमदार शिंदेंच्या रडारवर

उद्धव ठाकरे गटाचे 14 आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चेमुळे ‘ऑपरेशन टायगर पार्ट 2’ची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Published On: 

Eknath Shinde Operation Tiger 2 | Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडवून आणू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ‘ऑपरेशन टायगर २’ ची चर्चा सुरू असून, यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे.

काही महिन्यांपूर्वीच शिंदे यांनी ठाकरे गटाच्या सहा खासदारांना आपल्या बाजूने वळवून त्या गटाला मोठा धक्का दिला होता. आता याच गटातील आमदार त्यांच्या रडारवर असल्याचे वृत्त आहे. विशेषतः, ठाकरे गटाच्या २० पैकी १४ आमदारांचा शिंदे यांच्याशी संपर्क असल्याचे समजते.

या आमदारांना आपल्या गटात सामील करून घेण्याची जबाबदारी शिंदे यांनी तीन मंत्र्यांवर सोपवल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, शिंदे आज दुपारी २ वाजता दिल्लीला जाणार आहेत, मात्र एकनाथ शिंदेंचा यांचा हा दौरा रिझर्व्ह स्वरुपाचा आहे.

Eknath Shinde Operation Tiger 2 | Uddhav Thackeray

दिल्लीत शिंदे नेमके कोणाला भेटणार? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आज सकाळपासूनच ‘ऑपरेशन टायगर पार्ट २’ बाबत चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे ऑपरेशन टायगर आता राज्यात सक्रिय झाले आहे. राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत.

ते आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार नाहीत आणि त्याऐवजी थेट दिल्लीला रवाना होतील. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबतची पुढील सुनावणी २ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या कायदेशीर टीमला आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शिंदे यांची योजना आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटातील १४ आमदारांना आपल्या गटात आणण्याची जबाबदारी तीन मंत्र्यांवर सोपवली आहे. कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्र्यांवर ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते.

या १४ पैकी पाच आमदार सरकारमध्ये मंत्रिपद आणि महत्त्वाची खाती मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, तर इतरांना महामंडळांचे अध्यक्षपद किंवा राज्यमंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. या सर्व चर्चा अंतिम टप्प्यात असून, नवरात्री उत्सवापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात.

नगरसेवकांचा गट फुटणार का?

‘ऑपरेशन टायगर’चा पहिला टप्पा काही महिन्यांपूर्वी पार पडला होता, ज्यामध्ये उद्धव ठाकरे गटातील नऊपैकी सहा खासदारांनी पक्षांतर केले होते. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची नजर मुंबईच्या महापौरपदावरही आहे. त्यामुळे, महानगरपालिकेतील नगरसेवकांचा एक मोठा गट फुटू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खासदारांनंतर जर आमदारांनीही पक्षांतर केले, तर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसू शकतो.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही