Manoj Jarange: मराठा वादळ आता मुंबईत धडकणार, हे तर ठरलंय. पण हे वादळ गाजावाजा करत नाही, तर अगदी शांततेत मुंबईत शिरणार आहे! मनोज जरांगे पाटलांनी थेट सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आता एक वेगळाच ‘सिक्रेट प्लान’ आखलाय. अंतरवाली सराटीत त्यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. याच तिसऱ्या दिवशी त्यांनी मराठा बांधवांना थेट मुंबईत घुसण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
“गाडीला झेंडे लावू नका. एकत्र येऊ नका. हळूहळू मुंबईत घुसा.” हा जरांगेंचा नवा आदेश आहे. त्यांनी समर्थकांना १२ ते २० सप्टेंबर या काळात मुंबईत ठाण मांडून बसण्याची हाक दिली आहे. पोलिसांना अजिबात संशय येऊ न देता, ५-६ तारखेपासूनच मुंबईतल्या पाहुण्यांकडे किंवा मित्रांकडे मुक्काम ठोकण्याची ही रणनीती आहे.
शिंदे-फडणवीसांना कोंडीत पकडण्यासाठी Manoj Jarange यांचा ‘सिक्रेट’ आदेश!
जरांगेंनी सरकारला गाफील ठेवण्याचा डाव आखलाय. मुंबईत कोकण, मराठवाडा, विदर्भातील लाखो लोक राहतात. दोन-तीन लाख माथाडी कामगारही आपलेच आहेत. एका घरात ५ जण राहिले, तरी २० ते २५ लाख मराठा बांधव मुंबईत सहज गोळा होतील, असं गणित जरांगेंनी मांडलंय.
मित्रांकडे राहा, पोलिसांना संशय येऊ देऊ नका…’
थेट आझाद मैदान किंवा वर्षा बंगल्यावर जाऊ नका, नाहीतर त्यांना संशय येईल, अशी ताकीदही त्यांनी दिलीय. पोलिसांनी पकडलं तर हसत हसत पोलीस ठाण्यात जा. आपला लढा पोलिसांशी नाही, तर थेट एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांशी आहे, असं म्हणत जरांगेंनी निशाणा साधलाय.
जरांगेंनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनही जोरदार हल्लाबोल केला. “जेलमध्ये जाणारे लोक इकडे आले की लगेच संविधान बदलतं. तुम्ही २००० कोटींचा घोटाळा करा, तुम्हाला जेल होणार नाही. राज्यात सध्या दोन संविधान चालू आहेत,” असा घणाघात त्यांनी केलाय. त्यामुळे आता येत्या १२ तारखेपासून मुंबईत नेमकं काय चित्र दिसणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘माझा शाही मसाला मुघल काळातच एक्सपायर…’; तुकाराम मुंढेंच्या कारवाईवर ट्विंकल खन्नाची भन्नाट फिरकी!
- iPhone 18 Pro: ९ सप्टेंबरला ॲपलचा मोठा इव्हेंट; बाजारात येणार पहिलावहिला फोल्डेबल आयफोन?
- बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा मुद्दा कुणी आणला? अर्शद वारसीने थेट नाव घेत केला मोठा खुलासा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










