बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा मुद्दा कुणी आणला? अर्शद वारसीने थेट नाव घेत केला मोठा खुलासा!

बॉलिवूडमध्ये घराणेशाहीचा वाद कंगना रणौतनेच सुरू केल्याचा खुलासा अभिनेता अर्शद वारसीने केला आहे. तसेच स्टार किड्सच्या संघर्षावरही त्याने रोखठोक मत मांडले.

Published On: 

Arshad Warsi talking about Kangana Ranaut and nepotism in Bollywood

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने घराणेशाहीच्या मुद्दावर मौन सोडलंय. एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्याने थेट कंगना रणौतचं नाव घेत, कंगनानेच घराणेशाहीचा मुद्दा पहिल्यांदा समोर आणला. त्यानंतरच या विषयावर जोरदार चर्चा सुरू झाली, असा मोठा गौप्यस्फोट अर्शदने केला आहे. करिअरच्या सुरुवातीला हा विषय फारसा चर्चेत नव्हता, असंही त्याने स्पष्ट केलं.

‘स्टार किड्सला संधी लवकर मिळते, पण…’ Arshad Warsi

चित्रपटसृष्टीत घराणेशाही असल्याचं अर्शदने मान्य केलं. पण त्याचा त्याला अजिबात त्रास होत नाही. तो म्हणाला, “स्टार किड्ससाठी दरवाजे नक्कीच लवकर उघडतात. हे अगदी खरंय. पण, शेवटी तुमचं टॅलेंटच तुम्हाला पुढे घेऊन जातं. जर तुमच्यात गुणवत्ता नसेल, तर ते उघडलेले दरवाजे तितक्याच वेगाने बंदही होतात.”

अर्शदने यावेळी आपली मुलं झिक आणि झेने झो यांच्याबद्दलही भाष्य केलं. स्टार किड्स असल्याने त्यांच्यावरही आपोआप अपेक्षांचं ओझं येतं. पण, मला त्यांच्या यशाची किंवा अपयशाची कोणतीही भीती वाटत नाही. त्यांनी अभिनयाकडे केवळ एक कला म्हणून पाहावं आणि पूर्ण तयारीनेच या क्षेत्रात उतरावं, अशी त्याची इच्छा आहे. आजकालचे तरुण पूर्ण तयारीनिशी इंडस्ट्रीत येत असल्याकडेही त्याने लक्ष वेधलं.

दुसरीकडे, लवकरच अर्शद वारसी ‘घमासान’ या चित्रपटात झळकणार आहे. तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित हा चित्रपट ११ सप्टेंबरला झी ५ (ZEE5) वर प्रदर्शित होईल. यात त्याच्यासोबत प्रतीक गांधी आणि राजपाल यादवही दिसतील. याशिवाय तो शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाचाही भाग असणार आहे. सिद्धार्थ आनंदच्या या चित्रपटात शाहरुखसोबत सुहाना खान, दीपिका पदुकोण आणि अभिषेक बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दोन वर्षांच्या गॅपनंतर शाहरुखचा हा चित्रपट २४ डिसेंबरला थिएटरमध्ये धडकणार आहे. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही