प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने (CJP) पुकारलेल्या आंदोलनावर भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत यांनी सडकून टीका केली आहे. या आंदोलकांना ‘देशद्रोही’ म्हणत, या माध्यमातून भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
देशद्रोही, दहशतवादी आणि आंतरराष्ट्रीय शक्ती देशासाठी एक मोठी समस्या बनल्याचे राणौत यांनी म्हटले आहे. कोणतेही कारण पुढे करून देशाला आणि नागरिकांना त्रास देण्याचा कट रचला जात आहे. मात्र, लोकांना या आंदोलनाचा खरा हेतू समजला असून ते आता प्रश्न विचारत असल्याचा दावा त्यांनी केला. भारताला तोडण्यासाठी अनेक शक्ती कार्यरत असल्या तरी देशातील नागरिक एकजुटीने उभे असल्याचा विश्वास त्यांनी (Kangana Ranaut) व्यक्त केला.
आपण अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी जात असल्याचे सांगत कंगना राणौत म्हणाल्या, “जोपर्यंत प्रभू श्रीराम आणि भगवान हनुमान यांचा आमच्या डोक्यावर आशीर्वाद आहे, तोपर्यंत कोणीही काहीच करू शकत नाही.”
दरम्यान, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावर ठाम असलेल्या सीजेपीने दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे. राजीनामा मिळेपर्यंत मागे न हटण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, जंतर-मंतरकडे जाणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले जात आहे. या आंदोलनाचे लोण आता देशभरात पसरले असून मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावरही सीजेपीचे आंदोलक आक्रमक झाले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रात परतताच अभिजीत दीपकेंची मोठी घोषणा; मोदींवर हल्लाबोल करत जाहीर केला आंदोलनाचा प्लॅन
- दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, नेहा बोराने धावत्या बसमधून दाखवला पोलिसांच्या क्रूरतेचा चेहरा
- CJP च्या आंदोलकांना ताब्यात घेतल्याने मनसे, युवा सेना आक्रमक; अमित व आदित्य ठाकरेंनी अडवल्या पोलिसांच्या गाड्या
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









