Share

CJP चा विरोधकांच्या ‘सुप्रीम मार्च’ला पाठिंबा; इंडिया गेटपासून मोर्चाला होणार सुरुवात

सीजेपीने विरोधकांच्या इंडिया गेटवरून निघणाऱ्या सुप्रीम मार्चला पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे, सरन्यायाधीशांनी काँग्रेस नेत्यांना भेटण्यास नकार दिला आहे.

Published On: 

CJP supports opposition Supreme March in Delhi

प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: कॉकरोच जनता पार्टीने (CJP Protest) विरोधी आघाडीच्या ‘सुप्रीम मार्च’ला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षांचा सर्वोच्च न्यायालयावरील हा मोर्चा दुपारी १.३० वाजता इंडिया गेटपासून पुढे कूच करणार आहे.

तत्पूर्वी, सोमवारी सीजेपीचे नेते आणि सह-समन्वयक सौरव दास तसेच आशुतोष रांका यांनी जंतरमंतरवर आंदोलन करण्याची परवानगी मागण्यासाठी संसद मार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत या नेत्यांनी दिल्ली पोलिसांना २४ तासांचा अल्टीमेटम दिला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितले की, ते इतर मित्रपक्षांसोबत सर्वोच्च न्यायालयात जाऊन सरन्यायाधीश सूर्यकांत यांना निवेदन देणार आहेत. यासाठी मल्लिकार्जुन खरगे यांनी सरन्यायाधीशांना पत्रही पाठवले होते. मात्र, “मी कोणत्याही विशिष्ट पक्षाला भेटू शकत नाही,” असे सांगत सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भेटीस नकार दिला. याआधी काँग्रेससह विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते.

यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी दावा केला की, त्यांना केवळ ५ दिवसांपासून रोखले जात नसून हे अनेक वर्षांपासून सुरू आहे. तसेच, सरकारचे २०० अधिकारी आपल्या संपर्कात असून ते सतत माहिती देत असल्याचा मोठा दावाही त्यांनी केला.

“जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. पाच गुन्हेगारांनी देशाच्या आत्म्यावरच हल्ला केला आहे,” अशी ठाम भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही