नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP Protest Delhi) राजधानी दिल्लीत तीव्र आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामुळे दिल्लीत मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी आंदोलकांसह पक्षाच्या नेत्यांची मोठी धरपकड केली आहे. दिल्लीत पोहोचताच पक्षाचे प्रमुख अभिजित दीपके यांच्यासह आशुतोष रांका आणि सौरव दास यांना विमानातूनच ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आज न्यायालयाने काही अटींवर त्यांची सुटका केली.
सुटकेनंतर आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट केली. यावेळी सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी मदत करत असून, देशाचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या निवडणूक आयोगाने स्वतःची भूमिकाच धोक्यात आणली आहे, असा दावा त्यांनी केला. सीजेपीचा लढा निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्याच विरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आंदोलकांवरील पोलीस कारवाईवर संताप व्यक्त करताना रांका यांनी पंतप्रधान मोदींचा ‘हुकूमशाह’ असा उल्लेख केला. गेल्या ७२ तासांत देशात कोणीही कल्पना केली नसेल अशा घटना घडल्या आहेत. सरकारने नागरिक आणि पत्रकारांशी युद्ध पुकारले असून, या ७२ तासांतील कारवाईने आणीबाणीच्या काळालाही मागे टाकले आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दलही त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
यावेळी सीजेपीचे सदस्य सौरव दास यांनीही सरकारवर जोरदार निशाणा साधला. सरकारचे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडले असून त्यांचा अंत आता जवळ आला आहे, असा दावा दास यांनी केला. ज्ञानेश कुमार हे देशविरोधी असून सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- तामिळनाडूच्या विकासासाठी मुख्यमंत्री विजय यांच्यासोबत काम करणार; पंतप्रधान मोदींची चेन्नईत ग्वाही
- ठाण्यात हायप्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश, टीव्ही मालिकांमधील अभिनेत्रीची सुटका
- ‘छम छम करता…’ गाण्यासाठी सोनाली बेंद्रेने घेतलं नव्हतं मानधन; अनेक वर्षांनंतर मोठा खुलासा
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









