राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचा मोठा दावा

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवारच घेतील, असे सांगत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या चर्चांनाही पूर्णविराम दिला आहे.

Published On: 

Dattatray Bharne speaking on NCP merger and Sunetra Pawar

वाशिम, २७ नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दा सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील आणि तो आम्हा सर्वांना मान्य असेल, असे भरणे यांनी स्पष्ट केले आहे.

आमच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी असून प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हे आमचे नेते आहेत. मात्र, अंतिम निर्णय सुनेत्रा पवारच घेतील, असे भरणे म्हणाले. याशिवाय सुनेत्रा पवार या पुण्याच्या पालकमंत्री म्हणून काम करण्यास पूर्णपणे सक्षम असून, पालकमंत्री बदलण्याचा कोणताही विषय नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

भरणे यांनी नमूद केले की, सुनेत्रा पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री असून त्यांच्याकडे २ नंबरचे खाते आहे. त्यांनी आम्हाला आणि शेतकऱ्यांना ताकद दिली पाहिजे. सुनेत्रा वहिनींनी अजितदादांना जवळून काम करताना पाहिले असून, त्या खंबीरपणे महायुतीच्या सर्व घटकांना सोबत घेऊन चांगले काम करत आहेत.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार आणि दाऊद इब्राहिम यांच्या संबंधांबाबत केलेल्या वक्तव्यावरही भरणे यांनी उत्तर दिले. आम्ही लहान असल्यापासून पवार साहेबांवर असे अनेक आरोप झाले आहेत, मात्र त्यांच्यावर कोणताही आरोप कधीही सिद्ध झालेला नाही, असे दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही