पार्थ पवारांचा गेम! ५ महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या अर्जुन मेघेंची मुंबई राष्ट्रवादी युवक अध्यक्षपदी नियुक्ती

खासदार पार्थ पवार यांनी ५ महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या अर्जुन मेघे यांची मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली असून पक्षात पुन्हा नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता आहे.

Published On: 

Parth Pawar and Arjun Meghe NCP youth president appointment

प्रतिनिधी, २७ नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. खासदार पार्थ पवार यांनी आपले निकटवर्तीय आणि ५ महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या अर्जुन मेघे यांची मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पार्थ पवार यांच्या हस्ते मेघे यांना या नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

याआधीही पार्थ पवार यांनी उमेश पाटील आणि झिशान सिद्दीकी यांसारख्या आपल्या जवळच्या नेत्यांच्या परस्पर नियुक्त्या केल्या होत्या. या नियुक्त्यांमुळे पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता अर्जुन मेघे यांना थेट मुंबई युवक अध्यक्षपद दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नवे अध्यक्ष अर्जुन मेघे हे माजी मंत्री स्वर्गीय दत्ता मेघे यांचे चिरंजीव आहेत. राष्ट्रवादीत येण्यापूर्वी ते भाजप युवा मोर्चाचे दक्षिण मुंबई अध्यक्ष होते. काही महिन्यांपूर्वी मुंबईत आयोजित एका विशेष कार्यक्रमात राज्यमंत्री आणि विदर्भातील नेते इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत अर्जुन मेघे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हाती बांधले होते.

📌 महत्त्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही