‘RSS मुळेच भाजप सत्तेत’; अभिजीत दीपकेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

मोहन भागवतांच्या विधानाचा हवाला देत अभिजीत दीपकेंनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

Published On: 

Abhijit Dipke on BJP

‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके (Abhijit Dipke) यांनी रविवारी भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांचे म्हणणे ऐकण्याचे आवाहन केले. सत्ताधारी पक्षाने स्वतःला संघटनेपेक्षाही मोठे समजण्यास सुरुवात केली आहे, असा आरोप त्यांनी केला.

न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत म्हणाले, “ज्या हिंदूचा असा विश्वास आहे की मुस्लिमांनी भारतात राहू नये, ते मुळातच स्वत:ला हिंदू समजू नये.” मोहन भागवत यांच्या विधानानंतर अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे.

Abhijit Dipke on BJP

“मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे की, भाजपने मोहन भागवत यांचे म्हणणे ऐकले पाहिजे. १२ वर्षे सत्तेत राहिल्यानंतर आणि अनेक यंत्रणांवर नियंत्रण मिळवल्यानंतर भाजपला आपण आरएसएसपेक्षा मोठे झालो आहोत असे वाटते. तसेच भागवत यांनी यापूर्वी म्हटले आहे की आंदोलन करणाऱ्या ‘Gen z’ तरुणांना देशद्रोही म्हणू नये.” असे अभिजित दिपके म्हणाले.

पुढे अभिजित दीपके म्हणाले की, “पण पंतप्रधानांनी ‘दिमागी नक्षल’ ही नवीन संज्ञा वापरली. यावरून हे स्पष्ट होते की पंतप्रधान मोहन भागवत यांचे ऐकत नाहीत. एकीकडे आरएसएस प्रमुख समाजात सर्वांना सोबत घेऊन जाण्याबद्दल आणि मुलांचा अपमान न करण्याबद्दल बोलतात, तर दुसरीकडे पंतप्रधान असे शब्द वापरतात. हे चांगले दिसत नाही, त्यांनी किमान त्यांचे गुरू मोहन भागवत यांचे तरी ऐकले पाहिजे. आरएसएसमुळेच भाजप सत्तेत आहे.”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ (विश्व एकता सोहळा) या कार्यक्रमात भारतीय समुदायाला संबोधित केले.

यावेळी भागवत यांनी धर्म, मानवता आणि हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेवर भाष्य केले. मोहन भागवत म्हणाले की, “मी धर्माचा तज्ज्ञ नाही किंवा तुमच्यासारखा धर्माचा जाणकारही नाही. मात्र, मी अशा समाजात राहतो, काम करतो, जो पारंपरिकरित्या असे मानतो की धर्म वेगवेगळे असले तरी मानवता ही नेहमीच एक आहे.”

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही