‘शिंदेंसोबत वेळ जुळल्यासच परभणीत येणार’; बंडू जाधवांवर भडकलेल्या मनोज जरांगेंचा थेट इशारा

परभणीतील मेळाव्याला विरोध करणाऱ्या मनोज जरांगेंनी थेट एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आहे. तर बंडू जाधवांवर जोरदार हल्लाबोल केलाय.

Published On: 

Manoj Jarange Patil warns Eknath Shinde and Bandu Jadhav over Parbhani rally

Manoj Jarange: परभणीत आज नक्की काय होणार? एका बाजूला एकनाथ शिंदेंचा मोठा शेतकरी मेळावा. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा कडाडून विरोध. कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीसाठी जरांगे उपोषणाला बसलेत. पण त्यांचा खरा संताप उफाळून आलाय तो खासदार संजय (बंडू) जाधव यांच्यावर.

जरांगेंनी हा मेळावा रद्द करण्यासाठी जाधवांना थेट अल्टीमेटम दिला होता. पण जाधवांनी तो जुगारला. कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम होणारच, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. यानंतर जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झालेत. त्यांनी थेट परभणी गाठण्याचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने परभणी जिल्ह्याच्या सर्व सीमा सील केल्याची माहिती समोर आलीय.

यावर जरांगेंनी मराठा बांधवांना एक महत्त्वाचं आवाहन केलंय. “मी आलो तर तुम्ही या, इथं ताकद वाया घालवायची नाही,” असं ते स्पष्ट म्हणाले. आपली खरी ताकद मुंबईत दाखवायची आहे. त्यामुळे परभणीत उगाच शक्ती वाया घालवू नका, असा संदेश त्यांनी दिलाय.

पण त्यांनी एक मोठी अटही ठेवलीय. परभणीच्या सीमा कितीही बंद केल्या तरी आम्ही त्या पार करू. पण तिथे एकनाथ शिंदे आणि माझी वेळ जुळवून दिली पाहिजे. “अंतरवाली सराटी ते परभणी १५५ किलोमीटर अंतर आहे. मी तिथे आलो, तर आमचा थेट सामना झाला पाहिजे,” असा खणखणीत इशारा जरांगेंनी दिलाय. वेळ जुळल्यास आपण नक्की परभणीला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

दुसरीकडे, जरांगेंनी खासदार बंडू जाधवांवर जोरदार हल्लाबोल केलाय. “मराठ्यांनी तुला उभं केलं, हे तू विसरलास. हा कार्यक्रम रद्द न करणं ही तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे,” अशा शब्दांत त्यांनी जाधवांना सुनावलंय. कार्यक्रम घेणं हे तुमचं अस्तित्व नसून, मराठा समाज सांभाळणं हे तुमचं अस्तित्व होतं, याची आठवण त्यांनी करून दिली.

बंडू जाधव हा सगळ्यात थर्ड क्लास माणूस निघाल्याची बोचरी टीका त्यांनी केलीय. ५०० गुंड जवळ बाळगून राजकारण चालत नसतं. तुमच्यामुळे आणि शिरसाटमुळे एकनाथ शिंदे आणखी खोलात गेलेत, असा सणसणीत टोला जरांगेंनी लगावलाय. त्यामुळे आता परभणीत जरांगे खरंच धडकणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही