Share

पिंपरी-चिंचवडमधील २ महिला पोलिसांचा समलैंगिक विवाह, अखेर लग्नाच्या तोंडावर मोठा निर्णय!

पिंपरी-चिंचवड पोलीस दलात एकत्र काम करणाऱ्या दोन महिला पोलिसांनी ३० ऑगस्टला वैदिक पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चर्चेला उधाण आल्याने त्यांनी हा विवाह रद्द केला आहे.

Published On: 

Two women police constables from Pimpri Chinchwad cancel same sex marriage

Pimpri Chinchwad Same Sex Marriage: दोन महिला पोलीस अधिकारी प्रेमात पडतात, घरच्यांचा विरोध पत्करून थेट लग्नाची पत्रिका छापतात, आणि पोलीस ठाण्यात सुट्टीचा अर्जही देतात. पण ऐन लग्नाच्या काही दिवस आधी असं काय घडलं, ज्यामुळे हा सोहळा अचानक रद्द करावा लागला?

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या या दोन महिला शिपायांनी ३० ऑगस्टला आळंदीत वैदिक पद्धतीने लग्न गाठ बांधण्याचा निर्णय घेतला होता. पण, या समलैंगिक विवाहाची बातमी संपूर्ण पोलीस दलात आणि शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळेच, दोघींनीही सामंजस्याची भूमिका घेत तुर्तास हा विवाह रद्द केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Pimpri Chinchwad Police Same Sex Marriage

पोलीस भरतीच्या प्रक्रियेदरम्यान या दोघींची पहिल्यांदा ओळख झाली होती. खडतर प्रशिक्षण पार पाडल्यानंतर त्या पिंपरी-चिंचवड पोलीस दलात दाखल झाल्या. सुरुवातीला काही काळ मुख्यालयात एकत्र राहिल्यानंतर, सुदैवाने शहरातील एकाच पोलीस ठाण्यात त्यांची नियुक्ती झाली. तिथेच त्यांच्यात जवळीक वाढली आणि अखेर त्यांनी आयुष्यभर सोबत राहण्याचा निर्णय घेतला.

दुसरीकडे, एका महिला पोलिसाच्या कुटुंबीयांनी या नात्याला कडाडून विरोध केला. त्यांनी हे लग्न रोखण्यासाठी थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा दोघींचाही वैयक्तिक प्रश्न असल्याचे स्पष्ट करत, गरज पडल्यास फक्त समुपदेशनाची तयारी दर्शवली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघींपैकी एका महिला पोलिसाने स्वतःचे लिंगबदल (Gender Transition) करण्यासाठी मुंबईतील एका रुग्णालयात वैद्यकीय उपचारही सुरू केले आहेत. मात्र, या उपचारांचा आणि त्यांच्या नियोजित लग्नाचा कायदेशीर संबंध काय, हे अद्याप अस्पष्ट आहे. भारतात प्रौढ व्यक्तींमधील परस्परसंमतीचे समलैंगिक संबंध गुन्हा नसले तरी, सध्याच्या कायदेशीर चौकटीत अशा विवाहांना अधिकृत मान्यता नाही.

पोलीस दलातील चर्चेमुळे आणि कायदेशीर अडचणींमुळे हा विवाह सध्या तरी टळला आहे. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड पोलीस दलात हा असा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वीही एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने शासनाची परवानगी घेऊन लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती. पुरुष पोलीस म्हणून अधिकृत नोंदीत बदल करण्यासाठी तिने केलेला अर्ज अद्याप प्रलंबित आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही