🕒 1 min read
पुणे | प्रतिनिधी- वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणात सहआरोपी असलेला आणि बंदुकीच्या धाकाने दहशत निर्माण करणारा निलेश चव्हाण ( Nilesh Chavan ) अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. तो मागील १० दिवसांपासून फरार होता आणि नेपाळ बॉर्डरवरून त्याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वैष्णवीच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपासोबतच तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाची हेळसांड आणि पिस्तुल दाखवून धमकी दिल्याच्या प्रकरणात निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल आहे. २१ मे रोजी त्याने वैष्णवीच्या माहेरच्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून बाळ देण्यास नकार दिला होता. त्यांनंतर वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Nilesh Chavan Arrested at Nepal Border
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशेष पथक तयार करून महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा राज्यांमध्ये शोध घेतला. अखेर नेपाळ सीमेजवळ त्याला पकडण्यात यश आलं. पोलिसांनी त्याच्यावर लुकआऊट नोटीसही जारी केली होती.
कोण आहे निलेश चव्हाण?
निलेश चव्हाण हा बांधकाम आणि पोकलेन मशीन व्यवसायात कार्यरत आहे. तो शशांक हगवणेची बहीण करिष्मा हगवणेचा मित्र आहे. यापूर्वीही 2022 मध्ये पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ केल्या बद्दल, पत्नीच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी अटकपूर्व जामिन फेटाळण्यात आला असतानाही पोलिसानी त्याला अटक केली नव्हती. निलेशच्या अटकेमुळे वैष्णवी हगवणे प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- वादानंतर धनंजय मुंडेंचा मोठा निर्णय! पंकजा मुंडेंनी दिली मोठी प्रतिक्रिया
- महिला आयोगाचं सत्य बाहेर आलं! करुणा मुंडेंचा चकित करणारा मोठा खुलासा!
- तक्रारींचा पाठपुरावा करा, न्याय देण्याची जबाबदारी आमची आहे – रुपाली चाकणकरांचं आश्वासन