🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर- वकिलीच्या जगात अनुभवी चेहऱ्यांची गर्दी असते, पण यंदाच्या निवडणुकीत एका तरुण वकिलाने बाजी मारत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असलेले अॅड. ज्ञानेश्वर सुरेश बागुल (Adv Dnyaneshwar Bagul) यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. मतमोजणीअंती त्यांना ११२९ पहिल्या पसंतीची मते मिळालीत, तर एकूण ४६१८ असे विक्रमी मतदान झाले.
बार कौन्सिलचे सर्वात तरुण शिलेदार
या निकालाने कायदेशीर वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. Adv. ज्ञानेश्वर बागुल हे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे आतापर्यंतचे सर्वात तरुण सदस्य ठरले आहेत. पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजचे (ILS Law College) माजी विद्यार्थी असलेले बागुल, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई उच्च न्यायालयात वकिली करतात. दिवाणी, गुन्हेगारी आणि रिट याचिकांसारख्या कायदेशीर बाबींमध्ये त्यांचा दांडगा अनुभव असून, त्यांच्या या विजयामुळे तरुण वकिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या निवडणुकीत पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रवर्गातून अनेक दिग्गजांनी बाजी मारली आहे. पुरुष प्रवर्गातून ज्ञानेश्वर बागुलांसोबतच Adv. वसंत दिगंबरराव साळुंखे यांनीही विजय मिळवला आहे. हे दोन्ही विजयी उमेदवार छत्रपती संभाजीनगरचे आहेत.
त्यांच्यासोबतच पुरुष गटात परिजात पांडे, गणेश शिरसाट, राजेंद्र उमाप, आशिष देशमुख, मिलिंद थोबडे, संग्राम देसाई, जयंत जयभावे, विठ्ठल कोंडेदेशमुख, राजेंद्र अंभुळे, उदय वरुंजीकर, गजानन चव्हाण, विकास ढगे पाटील, सतीश देशमुख, विवेकानंद घाटगे, आसिफ कुरेशी आणि अहमदखान पठाण हे विजयी झाले आहेत.
दुसरीकडे महिला प्रवर्गातूनही मोठी चुरस पाहायला मिळाली. यात रंजना भोसले, क्षितिजा वाडतकर वानखेडे, अनिता कॅस्टेलिनो, माधवी पोटदार आणि उमा भट्टड या पाच महिला वकिलांनी घवघवीत यश मिळवत आपले स्थान निश्चित केले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शहराचे नाव बदलले, मग बँकेचे नाव का नाही? ADCC बँकेच्या नामांतरासाठी वकिलांचे थेट एमडींना पत्र
- अंशुमन विचारेच्या पत्नीसोबत भयंकर प्रकार, ‘तिचं अर्ध भांडं रक्त काढलं…’; अभिनेत्याचा वैद्यकीय क्षेत्राबाबत मोठा खुलासा
- ‘आता सांगायला हरकत नाही…’; जान्हवीने भरली सूरज चव्हाणच्या पत्नीची ‘चोर ओटी’, गुडन्यूजवर अखेर शिक्कामोर्तब
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












