Share

‘आता सांगायला हरकत नाही…’; जान्हवीने भरली सूरज चव्हाणच्या पत्नीची ‘चोर ओटी’, गुडन्यूजवर अखेर शिक्कामोर्तब

सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार असून जान्हवी किल्लेकरने त्याची पत्नी संजनाची ‘चोर ओटी’ भरल्याचा व्हिडीओ शेअर करत गुडन्यूज दिली आहे.

Published On: 

Suraj Chavan wife Sanjana chor oti ceremony video with Janhavi Killekar

‘बिग बॉस मराठी ५’ चा विजेता आपला ‘गुलीगत’ सूरज चव्हाण (Suraj Chavan) आता बाप होणार आहे, या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. तो कसा? तर चक्क अभिनेत्री जान्हवी किल्लेकरनं (Janhavi Killekar) एक गोड व्हिडीओ शेअर करत या आनंदाच्या बातमीवर थेट शिक्कामोर्तब केलंय.

सूरजची पत्नी संजना लवकरच एका चिमुकल्याला जन्म देणार आहे. या खास प्रसंगी जान्हवीने संजनाची ‘चोर ओटी’ भरली असून, या पारंपरिक सोहळ्याचा व्हिडीओ तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केलाय. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही जान्हवी आणि सूरजची मैत्री किती घट्ट आहे, हे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झालंय.

Suraj Chavan Good News

हा व्हिडीओ शेअर करताना जान्हवीने दिलेलं कॅप्शन सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. “मार्च महिन्यात भरलेल्या चोरओटीचा हा व्हिडीओ मी मुद्दाम आता शेअर करतेय. कारण आता कन्फर्म सांगायला काहीच हरकत नाही की, आपला सूरज लवकरच बाबा होणार आहे,” अशा शब्दांत तिने चाहत्यांना ही गोड बातमी दिली.

जान्हवीच्या या व्हिडीओवर आता सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. अभिनेता ओम यादवने कमेंट करत म्हटलंय की, “अभिमान वाटतो तुझा जान्हवी. तू फक्त नाती बोलून दाखवत नाहीस तर ती निभावून पण दाखवतेस.”

दुसरीकडे, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावरही जान्हवीला सर्व पारंपरिक विधी आणि पद्धती नीट माहीत आहेत, याचं नेटकऱ्यांनी विशेष कौतुक केलंय. तिचा हाच स्वभाव चाहत्यांना भावल्याचं कमेंट्समधून पाहायला मिळतंय.

तुम्हाला आठवत असेलच, नोव्हेंबर २०२५ मध्ये बारामतीत सूरज आणि संजनाचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. संजना ही सूरजची मामेबहीण असून, त्यांच्या लग्नाला बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील अनेक सदस्यांनी हजेरी लावली होती. आता सूरजच्या आयुष्यात येणाऱ्या या नव्या पाहुण्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही