🕒 1 min read
तुम्हीही सोनं खरेदीचा विचार करत आहात का? जर हो, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून वधारलेले सोन्या-चांदीचे (Gold Rate) दर आता अचानक कोसळले आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) चांदीच्या दरात तब्बल ५८०० रुपयांची मोठी घसरण पाहायला मिळाली. तर दुसरीकडे, सोन्याचे भावही १५०२ रुपयांनी स्वस्त झाले आहेत.
Gold Rate
या घसरणीमुळे MCX वर एका किलो चांदीचा दर थेट २,३०,४९३ रुपयांवर आला आहे. तसंच, एक तोळे सोन्याचा दर १,४६,४४४ रुपयांपर्यंत खाली आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय.
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेला तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमतीत होणारे बदल याचा थेट फटका सराफा बाजाराला बसला आहे. परिणामी, सोन्याचे दर गेल्या सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत.
अधिकृत आकडेवारीनुसार, कॉमेक्सवर (Comex) सोन्याचा दर ४१३२.८० डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आला आहे. चांदीचा दरही ६४.५९ डॉलर प्रति औंसवर आहे. गेल्या नोव्हेंबरच्या तुलनेत हे दर खूपच कमी आहेत.
त्यामुळेच, अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी अपेक्षेपेक्षा चांगली आल्याने फेडरल रिझर्व्ह व्याजदर उच्च ठेवण्याची दाट शक्यता आहे. सोन्यातून व्याज मिळत नसल्याने, व्याजदर वाढले की गुंतवणूकदार सोन्याकडे पाठ फिरवतात, हेच या मोठ्या घसरणीचं मुख्य कारण मानलं जातंय.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘मुंबईवर आपलं वर्चस्व, मराठी माणसांना प्रवेश नको’; प्रसाद वेदपाठकच्या ट्विटवर रिप्लाय, पोस्ट व्हायरल
- पोलीस अधीक्षकांची ‘धडक मोहीम’, मात्र बिडकीन पोलिसांचा अजब कारभार; गाडी ठाण्यात अन् चलन दुसऱ्याच गावात!
- एकाच दिवसात ११४९ वाहनचालकांवर कारवाई, पोलिसांच्या धडक मोहिमेत तब्बल १३ लाखांचा दंड वसूल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












