‘रोहित पवार लबाड लांडगा, राजकारणातला कलंक’, भाजप आमदारांची सडकून टीका

उजनी जलाशयातील एआय डेटा सेंटरच्या मुद्यावरून आमदार देवेंद्र कोठे यांनी आमदार रोहित पवारांवर जहरी टीका करत त्यांना ‘लबाड लांडगा’ म्हटले आहे.

Published On: 

BJP MLA Devendra Kothe criticizing Rohit Pawar over Ujani dam AI Data Center

सोलापूर, 31 ऑक्टोबर: उजनी जलाशयात उभारण्यात येणाऱ्या एआय डेटा सेंटरवरून सोलापुरात राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकल्पाला विरोध करणारे आमदार रोहित पवार यांच्यावर भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) हे लबाड लांडग्यासारखे शेतकऱ्यांच्या हिताचे सोंग करत असल्याची जहरी टीका आमदार कोठे यांनी केली.

उजनीतील डेटा सेंटरवरून सध्या सोलापुरात दोन गट पडले आहेत. एका बाजूला रोहित पवारांनी या प्रकल्पाविरोधात आंदोलनात उडी घेतली आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपने डेटा सेंटरच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात प्रकल्पाच्या समर्थनार्थ आंदोलन करत रोहित पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनावेळी बोलताना आमदार देवेंद्र कोठे यांनी पवारांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “रोहित पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला कलंक आहे. ते स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी गेल्या सहा महिने ते वर्षभरात राज्याच्या हिताच्या प्रकल्पांमध्ये ‘आंदोलनजीवी’ भूमिका घेत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे कधीही हित पाहिलेले नसून ते केवळ ढोंग करत आहेत.”

सोलापुरातील ‘बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना’ या म्हणीचा संदर्भ देत आमदार कोठे यांनी रोहित पवारांना लक्ष्य केले. बाहेरच्या जिल्ह्यातील असलेल्या रोहित पवारांनी सोलापूरच्या विकासात आणि पाण्याच्या प्रश्नात हस्तक्षेप करू नये, असा इशारा त्यांनी दिला. धरणात केवळ ९ टक्के भागात सोलर बसवणार असल्याने मासेमारीचे कुठलेही नुकसान होणार नाही. तसेच, देशात इतरत्र असे प्रकल्प यशस्वी झाले असून तिथे कोणतीही ओरड नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केवळ स्वतःची महत्त्वाकांक्षा आणि मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या जवळ जाऊन बसण्याची संधी मिळवण्यासाठी पवार शेतकऱ्यांना पुढे करून स्टंट करत असल्याचा आरोप आमदार कोठे यांनी केला. या प्रकल्पाविषयी रोहित पवारांकडून खोटा नरेटिव्ह पसरवला जात असून, प्रत्यक्षात या एआय डेटा सेंटरच्या माध्यमातून ४० ते ४२ हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळणार असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही